घरदेश-विदेशखुशखबर, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली!

खुशखबर, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली!

Subscribe

इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता ३१ जुलै २०१८वरून ३१ ऑगस्ट २०१८ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या करदात्यांना दिलासा तर मिळाला आहेच, पण त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी वाढीव मुदतही मिळाली आहे.

इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स हे तमाम करदात्यांसाठी जणू काही जिव्हाळ्याचेच विषय असतात. त्यामुळे यासंदर्भात काहीही नवीन घडामोड समोर आली, तर करदात्यांचं ब्लडप्रेशर एकतर वर तरी जातं किंवा खाली तरी येतं. पण करदात्यांचं ब्लडप्रेशर स्थिर करणारा एक दिलासादायक निर्णय नुकताच केंद्र सरकारने जाहीर केला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची अंतिम मुदत आता ३१ जुलै २०१८वरून ३१ ऑगस्ट २०१८ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या करदात्यांना दिलासा तर मिळाला आहेच, पण त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी वाढीव मुदतही मिळाली आहे. अर्थमंत्रालयाकडून ट्विटरवर देखील ही घोषणा करण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अर्थात सीबीडीटीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

उशीर केलात तर १० हजार दंड!

मागील आर्थिक वर्षापर्यंत अर्थात २०१७-१८पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न्स उशिरा भरण्यासाठी दंड आकारला जात नव्हता. मात्र चालू आर्थिक वर्ष अर्थात २०१८-१९पासून लेट लतिफांना दंड आकारला जाणार आहे. इन्कम टॅक्स अॅक्टमध्ये त्यासंदर्भात केंद्र सरकारकडून २३४फ या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार इन्कम टॅक्स अॅक्टच्या १३९(१) कलमामध्ये नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीनंतर टॅक्स भरणाऱ्यांना १० हजार रूपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. हा दंड टाळण्यासाठी मुदतीमध्येच करभरणा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

कसा आकारला जाणार दंड?

फायनान्स अॅक्ट २०१७मध्ये नमूद केल्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचा कर ३१ जुलै २०१८नंतर (आता ३१ ऑगस्ट) आणि ३१ डिसेंबर २०१८पूर्वी भरल्यास किमान ५ हजार रुपये दंड भरावा लागेल. मात्र, जर करभरणा १ जानेवारी नंतर केला गेला, तर हीच रक्कम १० हजारांपर्यंत वाढू शकेल. मात्र, करदात्याचं एकूण वार्षिक उत्पन्न जर ५ लाखाहून अधिक नसेल, तर त्याला आकारला जाणारा दंड जास्तीत जास्त १ हजार इतका असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -