घरताज्या घडामोडीCoroan: कोरोना टेस्ट वाढवा, पंतप्रधानांचे राज्यांना अपील

Coroan: कोरोना टेस्ट वाढवा, पंतप्रधानांचे राज्यांना अपील

Subscribe

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, ‘जसाजसा काळ जात आहे तसतसे महामारीचे रुपही बदलत आहे आणि बऱ्याच प्रकारच्या परिस्थिती समोर येत आहेत. बिहार, गुजरात आणि तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना टेस्ट वाढवणे गरजेचे आहे.’ तसेच ‘७२ तासांत कोरोना प्रकरणाची ओळख पटली तर जीव वाचू शकले’, असे तज्ज्ञ सांगत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले, ‘आता या ७२ तासांच्या फॉर्म्युलावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जेव्हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळेल, तेव्हा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ७२ तासांत कोरोना टेस्ट होणे गरजेचे आहे. दिल्ली-उत्तर प्रदेशमध्ये भयभयीत करणारी परिस्थिती होती. परंतु टेस्टिंग वाढवल्यामुळे परिस्थिती सुधारली आहे.’

- Advertisement -

‘सध्या सतत बैठक घेणे आवश्यक आहे. कारण महामारीच्या काळात नव्या गोष्टी समोर येत आहेत. आता रुग्णालयांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर, सामान्य लोकांवर दबाव आणला जात आहे. प्रत्येक राज्य आपापल्या स्तरावर महामारीविरोधात लढत आहे, केंद्र आणि राज्य आता एक टीम होऊन काम करत आहे. अशा मोठ्या संकटात प्रत्येकांसोबत काम करणे मोठी गोष्ट आहे. आज ८० टक्के Active रुग्ण फक्त दहा राज्यांमध्ये आहेत. देशात Active रुग्ण ६ लाखांहून अधिक आहे. सर्वात जास्त प्रकरणे १० राज्यात आहेत आणि या राज्यांसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. तसेचं सध्या देशातील पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे आणि रिकव्हरी रेट वाढत आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढवून मृत्यूदर १ टक्क्यापेक्षा कमी करायला पाहिजे. दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारसह एकूण दहा राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सामील झाले आहे. या राज्यात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे आहेत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मोदीजी इव्हेंट करा, पण ‘प्यारे देशवासीय’ वाचविण्याची मुव्हमेंट राबवा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -