घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: अमेरिकेत करोनाचं तांडव; जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत!

CoronaVirus: अमेरिकेत करोनाचं तांडव; जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत!

Subscribe

जगात अमेरिकेत सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेने यामध्ये चीनला देखील मागे टाकलं आहे.

जगभरात करोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चीनमध्ये वुहान शहरात उद्यास आलेल्या करोना व्हायरस आता अमेरिकेत थैमान घालत आहे. यामध्ये अमेरिकेने चीनला मागे टाकले आहे. चीनमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. आतापर्यंत अमेरिकेत ८५ हजार ६१२ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ८६८ करोनाचे रुग्ण हे व्हायरस फ्री झआले आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत करोनाचे १७ हजारहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेत वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत करोनामुळे २६८ जण मृत्यूमुखी पडले आहे. अमेरिकेत सर्वाधिक जास्त रुग्ण हे न्यूयॉर्क मध्ये आढळले आहेत. ३८ हजार ९७७ करोनाग्रस्त रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आढळले असून त्यापैकी ४६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

तर चीनमध्ये आतापर्यंत ८१ हजार ३४० करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ७४ हजार ५८८ करोनाचे रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत. चीनची परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. करोना व्हायरस जिथे उद्यास आलेल्या वुहान शहरातला लॉकडाऊन लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. येत्या ८ एप्रिलला हे लॉकडाऊन संपुष्टात येणार असल्याचं समोर येत आहे.


हेही वाचा – ओसामा बिन लादेनमुळे पाकिस्तानात थांबले लसीकरण, युनिसेफची तंबी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -