घरदेश-विदेशकोरोना पुन्हा वाढतोय; या चार शहरांमध्ये नाईट कर्फ्यू

कोरोना पुन्हा वाढतोय; या चार शहरांमध्ये नाईट कर्फ्यू

Subscribe

गेले काही दिवस पुन्हा एकदा कोरोनाच रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट झाल्या आहेत. कोरोना वाढता प्रभाव वाढल्याने पुन्हा एकदा सर्व राज्यांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता गुजरातमधील चार शहरांमध्ये पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गुजरातच्या अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि राजकोटमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री १२ ते सकाळी ६ अशी नाईट कर्फ्यूची वेळ आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखील कडक निर्बंध लागू होऊ शकतात, असा अलर्ट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे नियम पाळले जात नाही आहेत हे दुर्दैवी आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. याशिवाय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इशारा दिला आहे. कोरोनाबात खबरदारी घेतली जात नाही आहे. मास्क वापरलं जात नाही. याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला. जर नियम पाळले जात नसतील तर पुन्हा लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असा इशारा राजेश टोपे आणि अजित पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये चार राज्यांत नाईट कर्फ्यू

राज्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांनी सोमवारी नाईट कर्फ्यूचे आदेश आदेश जारी केले आहेत. अहमदाबाद, वडोदरा, सूरत आणि राजकोटमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री १२ ते सकाळी ६ अशी नाईट कर्फ्यूची वेळ आहे.


हेही वाचा – कोरोनाचे रुग्ण वाढतायत, कठोर निर्णय घ्यावे लागणार – अजित पवार

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -