घरCORONA UPDATELockdown: घरगुती हिंसाचारात वाढ, महिलांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Lockdown: घरगुती हिंसाचारात वाढ, महिलांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

Subscribe

राष्ट्रीय महिला आयोगच्या (एनसीडब्ल्यू) आकडेवारीत लॉकडाऊन दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देश लॉकडाऊन केला आहे. यामुळे लोकांचं काम बंद झालं असून लोक घरात बंदिस्त आहेत. काहीजण आपल्या कुटुंबियांसमवेत घरी वेळ घालवत आहेत, परंतु काही महिला आणि मुलांसाठी लॉकडाऊनने एक संकट निर्माण केलं आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावल्यामुळे घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे. महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी याचिकेत केली आहे.

जनहित याचिकेमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रीय महिला आयोगच्या (एनसीडब्ल्यू) आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, लॉकडाऊन दरम्यान घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या याचिकेत न्यायालयाने हेल्पलाईन सुरू करण्याची, नोडल अधिकारी तैनात करण्याची मागणी केली आहे. शिवाय, जनहित याचिकेमध्ये महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी तात्पुरते निवारा गृह बांधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होऊ शकते. ही जनहित याचिका इंडिया कौन्सिल ऑफ ह्युमन राइट्स, लिबर्टीज अँड सोशल जस्टिस या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाबाबत पसरवली अफवा; भाजपच्या खासदाराविरोधात गुन्हा दाखल


कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरलं आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल्स, मंदिरे, मशिदी, क्लब सर्व बंद करण्यात आलं आहे. रस्ते निर्जन आहेत. लॉकडाऊन असूनही, कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात १३ हजार ४३० जण कोरोनाबाधीत आहेत. तर, ४४८ लोक मरण पावले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -