पीएम मोदींच्या लोकप्रियतेत वाढ, २२ देशांच्या दिग्गज नेत्यांना टाकलं मागे

gujarat election 2022 results pm narendra modi on gujarat and himachal election

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय किंवा त्यांची काम करण्याची शैली ही वेगळीच आहे. त्यामुळे देशभरासह इतर देशातील नागरिकांना त्यांचं मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ऋषी सुनक यांच्यासारख्या २२ देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा दावा मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणातून केला जात आहे. ताज्या सर्वेक्षणात पीएम मोदींना ७८ टक्के रेटिंग्स मिळाले आहेत. हे रेटिंग्स २६ जानेवारी ते ३१ जानेवारी यादरम्यानचे आहे. या यादीत नरेंद्र मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची रेटिंग ५८ टक्के इतकी आहे. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची रेटिंग ४० टक्के आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे सातव्या क्रमांकावर आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत.

मॉर्निंग कन्सल्ट दररोज २० हजार पेक्षा जास्त मुलाखती घेते. यावेळी मिळालेल्या उत्तरांच्या आधारे जागतिक नेत्याबद्दल डेटा तयार केला जातो. अमेरिकेत त्याचा आकार ४५ हजार इतका आहे. तर इतर देशांचा आकार ५०० ते ५ हजारच्या दरम्यान आहे.


हेही वाचा : BBC Documentary वाद : SC कडून केंद्राला नोटीस, तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे