घरदेश-विदेशNRI सोबत लग्न केल्यामुळे भारतीय महिलांच्या समस्येत वाढ; परराष्ट्र मंत्रालयाने विधि आयोगाकडे...

NRI सोबत लग्न केल्यामुळे भारतीय महिलांच्या समस्येत वाढ; परराष्ट्र मंत्रालयाने विधि आयोगाकडे केली ‘ही’ मागणी

Subscribe

नवी दिल्ली : एनआरआयशी विवाह केल्यानंतर भारतीय वधूंना सोडून देण्यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) भारतातील अनिवासी (NRI) विवाहांच्या मुद्द्याची चौकशी करण्यास भारतीय कायदा आयोगाला सांगितले असून आंतरराष्ट्रीय सार्वजनिक कायदा आणि खाजगी कायद्यांच्या संदर्भात आपली चौकट मजबूत करण्यास विनंती केली आहे. (Increase in problems of Indian women due to marriage with NRIs The Ministry of External Affairs made demand to the Law Commission)

हेही वाचा – Israel Hamas War : गाझापट्टीवरील हमासचे नियंत्रण संपले; इस्रायल संरक्षणमंत्र्याचा दावा

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कायदा आयोग सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि या मुद्द्याला सामोरे जाण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने संरचनात्मक चौकट तपासत आहे. कायदा आयोगाच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय सार्वजनिक कायदा आणि खाजगी कायद्याचाही तपास केला जाणार आहे. यामुळे उल्लंघन करणार्‍या एनआरएला ज्या गोष्टीमुळे फायदा होतो, त्या त्रुटी दूर केल्या जातील, याची खात्री करणे आवश्यक असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. तसेच एनआरआयच्या विवाह नोंदणीवरील 2019 विधेयक आणि परदेशी विवाह कायदा यावरही आयोग लक्ष देणार आहे.

NRI शी विवाह करणाऱ्या भारतीय महिलांच्या तक्रारी

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एनआरआयशी विवाह केलेल्या भारतीय महिलांच्या वैवाहिक समस्यांशी संबंधित मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत आहेत. यामध्ये भारतात लग्नानंतर पत्नीचा त्याग करणे, जोडीदाराकडून व्हिसाचे प्रायोजकत्व मिळण्यास उशीर होणे, जोडीदाराने संवाद बंद केल्याची प्रकरणे, पती किंवा सासरच्या मंडळींकडून महिलांचा छळ होणे आणि जोडीदाराकडून एकतर्फी घटस्फोट यासारख्या तक्रारींचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये अनेकदा बाल संगोपन समस्या देखील समाविष्ट असतात.

- Advertisement -

हेही वाचा – एलॉन मस्कने मागितली पीयूष गोयल यांची माफी; कारण काय?

भारतीय महिलांसाठी 24×7 हेल्पलाइन कार्यरत

मंत्रालय आणि मिशन/केंद्रे अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियांबाबत पीडित भारतीय महिलांना योग्य समुपदेशन, मार्गदर्शन आणि माहिती प्रदान करतात. तसेच भारतीय मिशन्स आणि पोस्ट्स महिलांसह त्रस्त भारतीयांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी वॉक-इन सत्रे आणि ओपन हाऊस मीटिंग्स देखील आयोजित करतात. MADAD आणि CPGRAM पोर्टलद्वारेही भारतीय महिलांच्या तक्रारींचे निराकरण केले जाते. याव्यतिरिक्त, मिशन आणि पोस्टमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी 24×7 हेल्पलाइन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारेही महिलांना मदत केली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -