घरताज्या घडामोडीधमकीच्या पत्रानंतर सलमान खान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ, नक्की काय...

धमकीच्या पत्रानंतर सलमान खान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ, नक्की काय आहे प्रकरण?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक सलीम खान (Salim Khan) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाकडून सलमान आणि त्याच्या वडिलांची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मात्र, बड्या अभिनेत्याला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रकारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सलीम खान यांना मिळालं धमकीचं पत्र

काल ५ जून रोजी सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. सकाळी ७.३० ते ८.०० वाजेच्या सुमारास सलीम यांना त्यांच्या आणि सलमानच्या नावाने हे पत्र मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे दोघेही मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, ते ज्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी त्यांना हे धमकीचे पत्र मिळाले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर दोघांनीही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे.

- Advertisement -

नक्की प्रकरण काय?

रविवारी सकाळी इतर दिवसांप्रमाणेच ते मॉर्निंग वॉक संपवून एका बाकावर बसले होते. यावेळी सलीम यांच्या अंगरक्षकाने बाकावर पडलेलं पत्र पाहिलं. हे धमकीचं पत्र असल्याचं सलीम यांना लक्षात येता त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. एका अज्ञात व्यक्तीने सलीम खान यांना हे पत्र लिहिलं होतं. सलीम खान आणि सलमान खान, लवकरच तुमची अवस्था सिद्धू मूसेवालासारखी होईल, असा इशारा या खान पिता-पुत्राला पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

- Advertisement -

लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात असताना बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वास्तविक त्या काळात सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. यावेळी अभिनेता असीनसोबत रेडी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. यावेळी गँगस्टर लॉरेन्सने त्याच्या साथीदारांसह सलमानवर हल्ला करण्याची संपूर्ण योजना आखली होती. मात्र, आता पुन्हा एकदा सलमान आणि त्याच्या वडिलांना एका पत्राच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.


हेही वाचा : सिद्धू मूसेवाला हत्येनंतर पंजाब सरकार ताळ्यावर, ४२४ लोकांना पुन्हा सुरक्षा पुरवणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -