घरICC WC 2023विराटला मिठी मारणाऱ्या पॅलेस्टिनी समर्थकाला केले गुन्हे शाखेसमोर हजर; 'या' देशाचा आहे...

विराटला मिठी मारणाऱ्या पॅलेस्टिनी समर्थकाला केले गुन्हे शाखेसमोर हजर; ‘या’ देशाचा आहे नागरिक

Subscribe

काल आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यादरम्यान एक विचित्र घटना घडली. खरे तर, सुरू असलेल्या सामन्यादरम्यान पॅलेस्टिनी समर्थक सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसला.

अहमदाबाद: IND Vs AUS Final: काल आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यादरम्यान एक विचित्र घटना घडली. खरे तर, सुरू असलेल्या सामन्यादरम्यान पॅलेस्टिनी समर्थक सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसला. त्यानंतर मैदानात घुसलेल्या व्यक्तीने विराट कोहलीला पकडले. त्यानंतर आलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. (IND Vs AUS Final Palestinian supporter who hugged Virat appears Ahmedabad Crime Branch A citizen of Australia country)

गुन्हे शाखेत हजर

क्रिकेट ग्राऊंडमध्ये घुसलेल्या व्यक्तीला आज अहमदाबाद गुन्हे शाखेसमोर हजर करण्यात आले आहे. त्याला चांदखेडा पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले आहे.

- Advertisement -

ती व्यक्ती ऑस्ट्रेलियाची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती ऑस्ट्रेलियाची रहिवासी असून त्याने आपले नाव जॉन असल्याचे सांगितले. आपण पॅलेस्टाईनचे समर्थन करतो असे या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना सांगितले होते आणि ते दाखवण्यासाठी पॅलेस्टाईनचे समर्थन करणारे टी-शर्ट घालून मैदानात उतरला होता.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने विजय

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 240 धावा करू शकला. केएल राहुलने सर्वाधिक 66 धावांची संथ खेळी तर विराट कोहलीने 54, 47 धावांचे आणि सूर्यकुमार यादवने 18 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताकडून मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 4 विकेट गमावून सामना जिंकत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 120 चेंडूंत 137 धावांची सर्वाधिक खेळी केली.  याशिवाय मार्नस लॅबुशेनने नाबाद 58 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 तर, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(हेही वाचा: Fact Check: ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांनी कमिन्सचं अभिनंदन न केल्याचा व्हिडीओ व्हायरल; मात्र, सत्य काही वेगळेच)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -