Homeक्रीडाIND vs AUS : विराट कोहलीचा पारा चढला, ऑस्ट्रेलियाच्या नव्या खेळाडूला जाऊन...

IND vs AUS : विराट कोहलीचा पारा चढला, ऑस्ट्रेलियाच्या नव्या खेळाडूला जाऊन भिडला

Subscribe

भारताच्या क्रिकेट संघातील स्टार खेळाडू असलेला अँग्री यंग मॅन विराट कोहली हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय बनतो. आताही असेच काहीसे घडले असून यामुळे कोहली सर्वांच्या चर्चेचा विषय तर बनला आहेच, परंतु, त्याने सामना सुरू असताना केलेल्या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाईचा बडगा उभारला जाण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे.

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : भारताच्या क्रिकेट संघातील स्टार खेळाडू असलेला अँग्री यंग मॅन विराट कोहली हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय बनतो. आताही असेच काहीसे घडले असून यामुळे कोहली सर्वांच्या चर्चेचा विषय तर बनला आहेच, परंतु, त्याने सामना सुरू असताना केलेल्या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाईचा बडगा उभारला जाण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मेलबर्नमध्ये भारत वि. ऑस्ट्रेलिया हा चौथा कसोटी सामना सुरू असून या सामन्यात विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या नव्या खेळाडूला भिडला आहे. सॅम कॉन्स्टास असे ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूचे नाव असून या राड्यात पंचांना हस्तक्षेप करावा लागला. (IND vs AUS Virat Kohli and Sam Constance clash in Boxing Day Test news in Marathi)

मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत वि. ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्यावेळी 11 व्या षटकामध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. यावेळी बुमराहच्यासमोर ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम कॉन्स्टन्स होता. सॅमने सुरुवातीला मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मोठे शॉट मारत भारताला घाम फोडला. त्यानंतर सॅम कॉन्स्टन्स इतक्यावरच नाही थांबला तर त्याने बुमराहच्या गोलंदाजीवरही मोठे शॉट मारले. ज्यानंतर एका क्षणाला विराट कोहली बॉल उचलून सॅम कॉन्स्टन्सच्या दिशेने चालत आला. पण यावेळी सॅम कॉन्स्टन्स आणि कोहली या दोघांमध्येही धडक झाली आणि या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.

हेही वाचा… Jasprit Bumrah : कसोटी क्रमवारीत बुमराह अव्वल; बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी रचला इतिहास

चौथ्या कसोटी सामन्यातील सॅम कॉन्स्टन्स आणि कोहलीमध्ये धडक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये विराट कोहली सॅम कॉन्स्टन्सच्या दिशेने अत्यंत रागात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विराट कोहलीने हे जाणूनबुजून केले की चुकून झाले, याची चौकशी आयसीसीकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, यामध्ये विराट कोहली याचीच चूक असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने सांगितले आहे. पॉन्टिंगने चॅनल 7 या वाहिनीवर मुलाखत देत म्हटले की, विराट खेळपट्टीवर ज्याप्रमाणे चालत होता, यावरून त्याचा हेतू दिसून येतो. मला खात्री आहे की ही त्याची चूक आहे. आता काय झाले ते पंच आणि रेफ्रींनी देखील पाहिले असेल.

विराट कोहलीवर कारवाई होणार?

क्रिकेटमध्ये सामन्यांशी संदर्भात आयसीसीने काही नियम आखून दिले आहेत, त्या नियमांनुसार, क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानावरील इतर कोणत्याही व्यक्तीशी अनुचित शारीरिक संबंध केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते. अशा घटनांमध्ये खेळाडूला लेव्हल 2 अंतर्गत दोषी मानले जाते. तपासात विराट किंवा कॉन्स्टसपैकी कोणाचीही चूक आढळून आली तर 3 त्याला ते 4 डिमेरिट पॉइंट्सचे परिणाम भोगावे लागू शकतात.


Edited By Poonam Khadtale