विराटच्या मुलीला धमकावणारा भारतीयचं, तर पाकिस्तानमध्ये राहायला येण्याचं पाक नेत्यांच आमंत्रण

virat kohli angry

टी २० विश्व कप मध्ये दोन सामन्यात पराभव झाल्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीवर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. एवढेच नाही तर विराटच्या दहा महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार करण्याची धमकी एका विकृताने दिली होती. तो विकृत पाकिस्तानी नाही तर भारतीय असल्याचे समोर आले आहे.

विराटला मिळणाऱ्या धमक्यांवर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक यानेही आक्षेप घेतला असून खेळाडूंच्या कुटुंबीयांना लक्ष्य करणं अयोग्य असल्याचे म्हटल होतं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये विराट कम टू पाकिस्तान ट्रेंड होत आहे. यात पाकिस्तानच्या राजकारणी मंडळींनीही उडी मारली आहे. पाकिस्तानी आवामी तहरीक पॉलिटीकल पार्टीचे सचिव खुर्रम नवाज गंडापुर यांनी टि्वट केले आहे. यात त्यांनी पाकिस्तान अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच तुझ्या खेळाप्रती आणि कुटुंबीयांप्रती आम्हाला आदर आहे असे त्यांनी म्हटले असून पाकिस्तानी खेळाडू हरल्यानंतर आम्ही कधीही त्यांच्या कुटुंबाना लक्ष्य करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तर एका पाकिस्तानी यूजर्सने मोहम्मद हफीज आणि शोएब मलिकला रिटायर झाल्यानंतर आमच्या टीममध्ये तुला स्थान देऊ. तुला आणि हैदर अलीला मिडल ऑर्डरमध्ये खेळताना बघणे आमच्यासाठी अविस्मरणिय असेल. असे टि्वट केले आहे.