घरताज्या घडामोडीदिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन

Subscribe

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजवंदनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधन करत आहेत. विशेष म्हणजे मोदी सलग नवव्यांदा संबोधीत करत आहेत.

15 ऑगस्ट 1947 रोजी याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपला भारत 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशासाठी ‘राष्ट्रीय सुट्टी’ म्हणून पाळला जातो. त्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी ध्वज फडकविला जात आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यत आले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यातील लाहोरी गेटच्या वर भारतीय राष्ट्रध्वज उंचावला होता. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली आहे.

लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’सोबत जनतेच्या समस्यांची जाणीव ठेवावी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -