घरदेश-विदेशIndependence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुगलचं हे नवीन 'डुडल'

Independence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुगलचं हे नवीन ‘डुडल’

Subscribe

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या(75th independence day) उत्सहात गुगलने(google) सुद्धा डुडल(doodle) बनवून सहभाग घेतला आहे.

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देशभरातच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद गुगलकडून सुद्धा साजरा करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गुगलने सुद्धा एक कल्पक डुडल तयार केले आहे. भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे हे नवीन डुडल आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या(75th independence day) उत्सहात गुगलने(google) सुद्धा डुडल(doodle) बनवून सहभाग घेतला आहे.

हे ही वाचा – स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचप्राण संकल्पांची घोषणा

- Advertisement -

काही विशेष दिनानिमित्त किंवा काही विशेष औचित्य साधून गुगल नेहमीच नवनवीन डुडल तयार करत असतं. त्याच प्रमाणे जा 15 ऑगस्ट 2022 भारताच्या 75(75th independence day) व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने सुद्धा नवीन डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये एक स्त्री पतंग बनविता तर काही लहान मुले पतंग उठवीत खेळताना दिसत आहेत. भारताच्या केरळ राज्यातील कलात्मकतेचं वर्णन या डुडल मध्ये दिसत आहे. या विशेष दिनानिमित्त गुगलने एक खास GIF सुद्धा तयार केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – इतरांना ओझे वाटणारी भारतातील विविधता हा शक्तीचा अतूट पुरावा; पंतप्रधान मोदींच्या देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

भारत हा देश विवीधतेने नटलेला आहे. त्यामुळे भारतात विविध संस्कृती एकत्र नांदतात. त्यामुळेच गुगलच्या या नव्या डुडल मध्ये भारताची संस्कृती झळकते आहे. स्वातंत्र्य संग्रामात स्वतंत्र्य सेनानींनी त्यांच्या प्राणांची आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंग्रजांच्या विरोधात नारे देण्यासाठी सुद्धा या पतंगांचा वापर केला गेला आणि विरोधाची एक निशाणी म्हणूनही पतंग दडविण्यात आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.(75th independence day) भारताने 76 वर्षात पदार्पण केले आहे. याच निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी सुद्धा लाल किल्ल्यावर ध्वज फडकावला आणि देशाला संबोधित सुद्धा केले. भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो याच सदिच्छा भारतासाठी सर्व स्तरातून येत आहेत.

हे ही वाचा – दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -