घरदेश-विदेशभ्रष्टाचार, घराणेशाही, परिवार वादाविरोधात पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल

भ्रष्टाचार, घराणेशाही, परिवार वादाविरोधात पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल

Subscribe

स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत आज स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे. त्यानिमित्ताने लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९व्यांदा ‘तिरंगा’ फडकवला. यावेळी मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत अनेक मुद्द्यावर भाष्य केले. यावेळच्या भाषणात मोदींनी देशातील भ्रष्टाचार आणि परिवार वाद, घराणेशाही या तीन मुद्द्यांवर हल्लाबोल केला आहे. तसेच या तीन गोष्टींविरोधात लढण्याचा संकल्प केला आहे.

आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात ताकदीने लढले पाहिजे

मोदी म्हणाले की, आपल्या दुष्कृत्यांचे वेळीच निवारण केले नाही तर ते भयंकर रूप धारण करू शकते. पहिला भ्रष्टाचार, दुसरा घराणेशाही, परिवारवाद. भारतासारख्या लोकशाहीत जिथे लोक गरिबीशी झुंजत आहेत. एकीकडे ज्यांना राहायला जागा नाही, तर दुसरीकडे ते लोक आहे ज्यांकडे चोरी केलेला माल ठेवण्यासाठी जागा नाही. ही स्थिती चांगली नाही. आपल्याला भ्रष्ट्राचाराविरोधात ताकदीने लढले पाहिजे. गेल्या आठ वर्षात डायरेक्ट बिनिफिटद्वारे आधार मोबाईल या सर्व आधुनिक व्यवस्थांचा वापर करत चुकीच्या हातात गेलेले २ लाख कोटी रुपये थेट हस्तांतरणाद्वारे आम्ही देशासाठी वापरले. बँकांची मालमत्ता घेऊन पळून गेलेल्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून काही तुरुंगात आहेत. ज्यांनी देश लुटला त्यांना परत करावे लागले. ही परिस्थिती आपण निर्माण करू. मला भ्रष्टाचार संपवायचा आहे. मला हे संपवायचे आहे. माझ्या देशातील 130 कोटी जनतेने मला पाठिंबा द्यावा जेणेकरून हा देश जिंकू शकेल. मला सर्वसामान्य नागरिकाचे जीवन अभिमानाने जगवायचे आहे, अशा शब्दात मोदींनी देशातील भष्ट्राचारचे समुळ नष्ट करण्याचा संकल्प केला.

- Advertisement -

कौटुंबिक राजकारणापासून भारताचे राजकारण शुद्ध करूया

यावेळी मोदी घराणेशाही आणि परिवावार वादाववर बोलताना म्हणाले की, मी घराणेशाहीचा उल्लेख करतो तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलत आहे. नाही. दुर्दैवाने, राजकीय क्षेत्रातील ही दुष्टाई देशातील प्रत्येक संस्थेत शिरली आहे. त्यामुळे माझ्या देशाच्या प्रतिभेला तडा जाते. माझ्या देशाच्या ताकदीवर त्याचा परिणाम होतो. प्रत्येक संस्थेत त्याबद्दल द्वेषाची भावना निर्माण केली पाहिजे. संस्थांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. राजकारणातही कौटुंबिक राजकारणाने खूप नुकसान झाले आहे. मात्र हे कौटुंबिक राजकारण कुटुंबासाठी असते, त्याचा देशाशी काही संबंध नसतो. यामुळे भारताचे राजकारण शुद्ध करूया, भारतातील सर्व संस्थांच्या शुद्धीकरणासाठी गुणवत्तेच्या जोरावर देशाचा विकास करावा लागेल. अशा शब्दात त्यांनी घराणेशाही आणि परिवार वादावर आपले मत मांडले.


पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिले ‘हे’ 5 संकल्प

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -