Independence Day 2022 : गाडीवर तिरंगा फडकवण्याआधी नियम वाचा, नाहीतर होईल तीन वर्षांची शिक्षा

शल मीडियावरील प्रोफाईललाही तिरंगा लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, काहींनी आपल्या गाड्यांवरही तिरंगा लावले आहेत. मात्र, कायद्यानुसार, कोणत्याही गाड्यांवर तिरंगा लावण्यास मनाई करण्यात आली आहे. 

tricolor on rules for vehicle

स्वातंत्र्य मिळून भारताला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) अंतर्गत मोदींनी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियान राबवलं आहे. त्याअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे. तसेच, सोशल मीडियावरील प्रोफाईललाही तिरंगा लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, काहींनी आपल्या गाड्यांवरही तिरंगा लावले आहेत. मात्र, कायद्यानुसार, कोणत्याही गाड्यांवर तिरंगा लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम आजपासून सुरू; जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याबाबतचे महत्त्वाचे नियम

भारतीय ध्वज तिरंगा वापरणे आणि फडकवणे यासंबंधीचे भारतीय ध्वज संहितेच्या नियमानुसार, कोणत्याही वाहनावर (दुचाकी, चारचाकी, ट्रेन, विमान, जहाज) झेंडा लावू नये. ठराविक व्यक्तींच्या वाहनांशिवाय कोणत्याही वाहनात ध्वज प्रदर्शित करता येणार नाही. फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे उपाध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या वाहनांवर बसवता येईल.

नियमभंग केल्यास काय होईल?

भारतीय ध्वज संहितानुसार जो कोणी या नियमांचं पालन करत नाही, त्यांना तीन वर्षांची शिक्षा आणि दंडात्मक कारवाई होते. नियमानुसार तिरंग्याची लांबी, रुंदी, उंची ठरवून देण्यात आलेली आहे. त्या आकारतच तिरंगा असला पाहिजे.

हेही वाचा – Independence Day 2022: भारताच्या राजकारणातील रणरागिणी

कोणत्या वाहनावर किती आकाराचा झेंड लावणार?

भारतीय ध्वज संहितानुसार वाहनावर फडकवण्यात येणाऱ्या ध्वजाचा आकार ठरवण्यात आला आहे. 450 x 300 मिमी आकाराचे ध्वज व्हीव्हीआयपी फ्लाइटवरील विमानांसाठी, मोटार कारसाठी 225 x 150 मिमी आकाराचे आणि टेबल ध्वजांसाठी 150 x 100 मिमी आकार ठरवून देण्यात आले आहे.


संबंधित बातम्या वाचा