घर देश-विदेश Independence Day : स्वातंत्र्यदिनी 954 पोलिसांना पोलीस पदकांनी गौरविणार; महाराष्ट्राला किती पदके?

Independence Day : स्वातंत्र्यदिनी 954 पोलिसांना पोलीस पदकांनी गौरविणार; महाराष्ट्राला किती पदके?

Subscribe

Independence Day : सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विविध केंद्रीय आणि राज्य दलातील एकूण 954 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार देशभरातील 230 जवानांना पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे. यात शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदकाचाही (PPMG) समावेश करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त वर्षातून दोनदा ही पदके जाहीर केली जातात. (Independence Day 954 policemen will be honored with police medals on Independence Day How many medals for Maharashtra)

हेही वाचा – PM Modi Speech : पंतप्रधानाच्या मंगळवारच्या संबोधनाकडे देशवासीयांचे लक्ष; काय करणार यावेळी घोषणा?

राष्ट्रपती पोलीस पदकाचा मान कोणाला?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ अधिकारी लोकरकपम इबोमचा सिंग हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सेवेतील हे दुसरे शौर्य पदक आहे. याशिवाय विशेष सेवेसाठी 82 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी 642 पोलीस पदके देण्यात येणार आहेत.

कोणत्या राज्याला किती पोलीस पदके?

जम्मू आणि काश्मीर राज्याच्या सैन्याला शौर्यासाठी सर्वात जास्त पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला 55 पोलीस पदके (PMG) दिली जाणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र पोलिसांना 33, केंद्रीय राखीव पोलीस दलाला 27 आणि छत्तीसगड पोलिसांना 24 पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राम मंदिरातील कर्मचाऱ्यांना मिळणार ‘या’ सुविधा; भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नाही

महाराष्ट्रात पोलीस पदक मिळालेल्याची नावे

पोलीस शौर्य पदकांमध्ये महाराष्ट्रातल्या रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे. राज्यातल्या 33 पोलिसांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. याशिवाय राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अमरावती, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना  विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये प्रवीणकुमार पडवळ (पोलीस सहआयुक्त, मुंबई शहर), विजय पाटील (पोलीस उप महानिरीक्षक, एसीबी, मुंबई), राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यातल्या 40 पोलिसांना जाहीर झाले आहे. तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये गोव्यातील पोलीस उप अधीक्षक सुदेश नाईक यांचा समावेश आहे.

शौर्यासाठी दिली जातात पदके

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक (PPMG) आणि शौर्य पोलीस पदक (PMG) ही दोन्ही पदके जीवन आणि मालमत्ता वाचवणे, गुन्हेगारी रोखणे किंवा गुन्हेगारांना पकडणे यातील विशिष्ट शौर्याच्या आधारावर प्रदान केली जातात. पोलीस सेवेतील विशिष्ट विक्रमासाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) दिले जाते. तसेच गुणवान सेवेसाठी पोलीस पदक (PM) साधनसंपत्ती आणि कर्तव्याची निष्ठेद्वारे वैशिष्ट्यीकृत मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते.

- Advertisment -