Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Independence Day:स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मेड इन इंडियाचे हेलिकॉप्टर करणार पुष्पवृष्टी

Independence Day:स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मेड इन इंडियाचे हेलिकॉप्टर करणार पुष्पवृष्टी

Subscribe

यापूर्वी, लाल किल्ल्यावरील मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाप्रसंगी फुलांचा वर्षाव करण्याची परंपरा 2021 मध्ये सुरू झाली होती.

नवी दिल्ली : यंदा स्वातंत्र्य दिन जरा आपल्यासाठी खास असणार आहे. कारण, या स्वातंत्र्यदिनी मेड इन इंडियाच्या हेलिकॉप्टरची झलक 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान प्रथमच दोन एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरचा पुष्पवृष्टीसाठी वापर केला जाणार आहे.

यापूर्वी, लाल किल्ल्यावरील मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाप्रसंगी फुलांचा वर्षाव करण्याची परंपरा 2021 मध्ये सुरू झाली होती. ज्यासाठी रशियन-निर्मित Mi-17 V5 ला समाविष्ठ करण्यात आले होते. मात्र यावर्षी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यासाठी दोन एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर वापरण्यात येणार आहेत.\

- Advertisement -

हेही वाचा : देशातील जनतेचा काँग्रेसवरील अविश्वासाचा खूप मोठा इतिहास; कॉंग्रेसचे सरकार नसलेल्या राज्यांचा वाचला मोदींनी पाढा

पंतप्रधानाच्या संदेशाकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून सलग दहावे भाषण करणार आहेत. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान काय संदेश देणार, याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी संसदेत अविश्वासावर बोलताना पंतप्रधान मोदींनी एचएएल ध्रुव हेलिकॉप्टरचे कौतूक केले होते.

- Advertisement -

हेही वाचा : Air India New Logo: नवा रंग आणि लोगोसह एअर इंडियाचं रीब्रँडिंग

1800 विशेष पाहणु असणार उपस्थित

एचएएलने बनवलेले हेलिकॉप्टर ही संरक्षण क्षेत्रातील युनिटची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. पुष्पवृष्टीनंतर पंतप्रधान सहभागींच्या सन्मानार्थ भाषण देणार आहेत. यावेळी 1800 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारत भूषण बाबू यांनी ट्विट करुन स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रातील सुमारे 1,800 विशेष पाहुणे सहभागी होणार असल्याची माहिती दिली.

- Advertisment -