ना भाजपाने ना काँग्रेसने दिली उमेदवारी, संतप्त होऊन अपक्ष म्हणून उतरला मैदानात आणि…

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. या विजयसह काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये असलेली भाजपाची सत्ता हिसकावून घेतली. हिमाचलच्या ६८ पैकी ४० जागा जिंकत काँग्रेसने निवडणूक जिंकली. मात्र या निवडणुकीत हमीरपूर मतदारसंघ चर्चेत आला आहे.

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. या विजयसह काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये असलेली भाजपाची सत्ता हिसकावून घेतली. हिमाचलच्या ६८ पैकी ४० जागा जिंकत काँग्रेसने निवडणूक जिंकली. मात्र या निवडणुकीत हमीरपूर मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदार संघात भाजपातून काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर अपक्ष म्हणुन निवडणुकीत उभे राहिलेले आशिष शर्मा यांनी बाजी मारली आहे. (Independent Candidate Ashish Sharma Wins From Hamirpur In Himachal Election Result 2022)

नेमके प्रकरण काय?

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत हमीरपूर मतदारसंघात आशिष शर्मा विजयी झाले. विशेष म्हणजे आशिष शर्मा भाजपमध्ये होते. मात्र त्यांना यावेळी तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसचा हात धरला. मात्र काँग्रेसनंही त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शर्मांनी अवघ्या ४८ तासांत काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

नामांकनाची वेळ संपायला अवघ्या दीड तासांचा अवधी शिल्लक असताना काँग्रेसने हमीरपूरमध्ये उमेदवार दिला. शर्मांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल ४७ टक्के मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस, भाजपचे नेते चकित झाले.

भाजपाचे नेते आशिष शर्मा यांनी काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत शर्मांनी पक्षात प्रवेश केला. मात्र आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी ४८ तासांत काँग्रेसचा हात सोडला. दरम्यान, आशिष शर्मा यांनी २५ हजार ९१६ मतांनी विजय मिळवला. तसेच, या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार आहे. काँग्रेसच्या पुष्पिंदर वर्मांना १३ हजार १७ मते मिळाली.

हिमाचल प्रदेशात भाजपमध्ये मोठी बंडखोरी पाहायला मिळाली. एकूण ३५ जणांनी बंडखोरी केली. पैकी केवळ दोन जिंकले. बाकीचे पराभूत झाले. कांगडामधील देहरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर होशियार सिंह विजयी झाले. सिंह यांना २२ हजार ९९७ मतं मिळाली. तर भाजपच्या रमेश चंद यांना १६ हजार ७३० मतं मिळाली. काँग्रेसचे राजेश शर्मा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना १९ हजार १२० मतं मिळाली.

हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलतात. हिमाचलचे मतदार पाच वर्षांनी सत्तापालट करतात. ही परंपरा तोडण्यासाठी भाजपनं ‘राज नहीं रिवाज बदलो’ या टॅगलाईनवर प्रचार केला. मात्र तरीही भाजपला सत्ता राखता आली नाही. ६८ पैकी ४० जागा जिंकत काँग्रेसनं निवडणूक जिंकली.


हेही वाचा – हिमाचलमधील विजयी काँग्रेस आमदारांची आज शिमल्यामध्ये बैठक