Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश INDIA: देशाला अंधारात ठेवलं जातंय...; विरोधी पक्षांचा मोदी सरकारवर आरोप

INDIA: देशाला अंधारात ठेवलं जातंय…; विरोधी पक्षांचा मोदी सरकारवर आरोप

Subscribe

संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत राजकीय भांडण सुरू आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. देशाला अंधारात ठेवू नये, असे विरोधी पक्षनेत्यांच म्हणणं आहे. तसंच, संसदेच्या विशेष अधिवेशनात(18-22 सप्टेंबर) पारदर्शकता निर्माण करावी, अशी मागणी देखील विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत राजकीय भांडण सुरू आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. देशाला अंधारात ठेवू नये, असे विरोधी पक्षनेत्यांच म्हणणं आहे. तसंच, संसदेच्या विशेष अधिवेशनात(18-22 सप्टेंबर) पारदर्शकता निर्माण करावी, अशी मागणी देखील विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयक लवकर मंजूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार आहेत. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत आधीच मंजूर झालं आहे. (INDIA Aghadi The country is being kept in the dark Opposition parties accuse Modi government )

हा भाजपचा डाव

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते जिथे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा केली. चर्चेदरम्यान अदानी प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला. या बैठकीत ‘इंडिया आघाडी’ची चौथी बैठक भोपाळमध्ये आयोजित करण्यावरही चर्चा झाली.

- Advertisement -

लोकसभा चालवण्याचा हा मार्ग नाही. भाजपला महागाई, बेरोजगारी, मणिपूर वाद, चीन वाद, कॅगचा अहवाल आणि इतर घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष वळवायचे आहे आणि जनतेला अंधारात ठेवायचे आहे म्हणून हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा: सनातन धर्म वक्तव्यावरून वाद: उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा दाखल )

सरकार देशाला अंधारात ठेवतंय

- Advertisement -

संसदेच्या विशेष अधिवेशनात मुद्दे मांडण्यास आम्ही मागे हटणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. ते म्हणाले की, इंडिया एक होईल आणि इंडिया जिंकेल. काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले की, विरोधी पक्ष सरकारला सतत प्रश्न विचारत आहेत की विशेष अधिवेशन का बोलावले गेले, परंतु अद्यापपर्यंत सरकारने कोणतेही उत्तर दिलेले नाही. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, संसद देशाची आहे. सरकार देशाला अंधारात ठेवत आहे. हे सरकार ना पारदर्शक आहे ना जबाबदार आहे. आम्ही संसदेत फक्त मोदी चालीसासाठी बसलेलो नाहीत. विशेष अधिवेशनात आम्ही आमचे मुद्दे मांडणार आहोत. संसदेत विरोधकांची उपस्थिती केवळ टाळ्या वाजवून बसण्यासाठी नसते, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

- Advertisment -