घरदेश-विदेशINDIA Rally : इंडियाच्या महासभेत महिला आघाडीवर; सुनिता केजरीवाल, कल्पना सोरेन सांगणार...

INDIA Rally : इंडियाच्या महासभेत महिला आघाडीवर; सुनिता केजरीवाल, कल्पना सोरेन सांगणार पतीचा संदेश

Subscribe

INDIA alliance Rally At Ramlila Maidan Live Updates नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज इंडिया आघाडी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करणार आहे. इंडिया आघाडीचे दिल्लीतील रामलीला मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन या दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांना ईडीने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने दिल्लीत महारॅलीचे आयोजन केले आहे. सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली, तर केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर असतानाच अटक करण्यात आली आहे. त्यांनी अटकेनंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. या दोन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही या महारॅलीत सहभागी होणार असून, महासभेला संबोधितही करणार आहेत.

इंडिया आघाडीच्या महासभेचा उद्देश संविधानाचे रक्षण, लोकशाहीला वाचवणे आहे. या महारॅलीमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते खासदार, राहुल गांधी, काँग्रेस महासचिव राहुल गांधी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री समाजवादी पार्टीचे नेते अखिलश यादव, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ ब्रायन, डाव्या आघाडीचे सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते खासदार शरद पवार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : BharatRatna : पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींचा अपमान; भारतरत्न देताना द्रौपदी मुर्मू उभ्या अन् मोदी खुर्चीवर बसून

ज्या दिवशी संविधान संपले त्यानंतर हा देश वाचणार नाही. – राहुल गांधी, नेते काँग्रेस

– तुम्ही मीडियाला शांत करु शकता पण या देशाचा आवाज दाबू शकत नाही
– भाजप खासदाराने म्हटले आहे की आम्हाला चारशे पार जागा हव्या आहेत. कारण आम्हाला संविधान बदलायचे आहे.
– भाजपने हे उगाच म्हटलेले नाही. ते टेस्ट करुन पाहत आहेत, तुमची त्यावर काय प्रतिक्रिया आहे.
– या देशाचे संविधान संपले तर हा देश वाचणार नाही.
– संविधान संपवयाची भाषा हे करत आहेत, कारण त्यांना तुमच्याकडील साधन संपत्ती संपवायची आहे.
– भाजपची मॅचफिक्सिंग यशस्वी झाली तर संविधान नष्ट होईल. संविधान नष्ट झाले तर या देशाच्या ह्रदयावर घाव असेल.
– ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. गरीब, सर्वसामान्य लोकांचे अधिकार वाचवण्याची ही निवडणूक आहे.
– या निवडणुकीत मॅचफिक्सिंग केली जात आहे. हे देशभरात दिसत आहे.
– इलेक्शन कमिशनची निवड ही नरेंद्र मोदींनी केली आहे.
– दोन मुख्यमंत्र्यांना ऐन निवडणुकीच्या आधी तुरुंगात टाकले आहे. ही कारवाई निवडणुकीच्या सहा महिने आधी किंवा नंतरही करु शकले असते.
– काँग्रेसचे बँक अकाऊंट ऐन निवडणुकीच्या तोंडावर फ्रिज करण्यात आले. हेही तुम्ही सहा महिने आधी किंवा नंतरही करु शकले असते.
– निवडणूक आयोगावर, सुप्रीम कोर्टावर यांचा दबाव आहे.
– यांना मॅचफिक्सिंग करायची आहे, त्यामुळे असे निर्णय घेतले जात आहेत.

- Advertisement -

सोनिया गांधींची रामलीला मैदानावर उपस्थिती

अब की बार भाजपा तडीपार, महासभेत उद्धव ठाकरेंची घोषणा

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने आता जाहीर करुन टाकावे की त्यांच्या युतीमध्ये आता ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्स आहे. भाजपने या देशात आता एक पक्ष एक नेता असे तंत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -