घरCORONA UPDATEDoor to door corona vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, आता घरीच मिळणार...

Door to door corona vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, आता घरीच मिळणार कोरोनाविरोधी लस

Subscribe

वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम अधिक वेगाने राबवली जात आहे. मात्र ही लस घेण्यासाठी नागरिकांना सरकारने किंवा पालिकेने नेमूण दिलेल्या केंद्रावर जाऊनच लस घ्यावी लागत होती. मात्र आता घरच्या घरी कोरोनाविरोधी लस मिळणार आहे. कारण केंद्र सरकारे ‘डोअर टू डोअर’ Corona vaccination at home) लसीकरण मोहिमेला परवानगी दिली आहे. यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनाही केंद्राने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी (Corona vaccination) आता आजारी, शारिरीक दृष्ट्या असक्षम नागरिकांना तासांतास रांगे उभं राहण्याची गरज भासणार नाही. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात घोषणा केली. (Door to door corona vaccination)

यावेळी डॉ. पॉल यांनी सांगितले की, ज्या लोकांना कोरोनाविरोधी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाता येत नाही अशा लोकांसाठी डोअर टू डोअर लसीकरण सुरु करत आहोत. यासाठी नवीन गाइडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता दिव्यांग आजारी, आजारपणामुळे अंथरूणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांसाठी घरीच कोरोना लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही.

- Advertisement -

यापूर्वी लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचणं शक्य होत नसलेल्या नागरिकांना सरकारने जवळच लसीकरण केंद्र उपलब्ध करून दिले होते. पण अद्यापही काही लोकांना तिथपर्यंतही जाता येत नाही हे सरकारच्या निदर्शनास आलं. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे आता कितीतरी नागरिकांचा लसीकऱणाचा मार्ग सोपा झाला आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा आकडाही अधिक वाढवण्यास मदत होईल.

- Advertisement -

सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. आत्तापर्यंत ८३ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. यातील २३ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहे.


PM Modi US Visit : मोदींनी कोरोनातील मदतीसाठी कमला हॕरिस यांचे मानले आभार, भारत दौऱ्याचेही निमंत्रण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -