kabul airport attack: ‘या दहशतवादी हल्ल्यामागे IS संघटना’, काबूल हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध

india also strongly condemned the bomb attacks near Kabul airport
kabul airport attack: 'या दहशतवादी हल्ल्यामागे IS संघटना', काबूल हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल विमानतळा (Kabul Airport) जवळ गुरुवारी रात्री बॉम्बस्फोट (Blast) झाले. यामुळे काबूल हादरलं असून आता या हल्ल्यातील मृत्यूचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. माहितीनुसार आतापर्यंत या हल्ल्यात ७२ लोकांचा मृत्यू झाला असून १४० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचे १३ सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हल्ल्याचा सुत्रधारांना इशारा दिला आहे (joe Biden warns Kabul airport attackers). ‘या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. आता चुकीला माफी नाही,’ असे जो बायडेन म्हणाले आहे. भारताने देखील काबूल विमानतळावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या मागे IS संघटना असल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काबूलमधील हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली असून यात सांगण्यात आले आहे की, काबूलमधील बॉम्बस्फोटाला तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या हल्ल्यानंतर संपूर्ण जगाने दहशतवादी आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणाऱ्यांविरोधात एकत्र येणे गरजेचे झाले आहे. दरम्यान काबुलमधून येणाऱ्या वृत्त या हल्ल्याच्या मागे इस्लामिक दहशतवादी संघटना IS (इस्लामिक स्टेट) जबाबदार आहे, असे सूचित करत आहेत.

१५ ऑगस्ट रोजी तालिबानाने काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर भारताने या दहशतवादी संघटनेबद्दल इशारा दिला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले होते की, ‘अफगाणिस्तानात अस्थितरता पसरल्याने संपूर्ण क्षेत्रात आयएसचा धोका वाढला आहे.’


हेही वाचा – kabul airport attack: काबूल हल्ल्यात १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू; जो बायडेन म्हणाले,’आता चुकीला माफी नाही’