घरताज्या घडामोडीआज भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार SCO बैठकीत आमने-सामने

आज भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार SCO बैठकीत आमने-सामने

Subscribe

भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बऱ्याच काळानंतर आज, बुधवारी ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमध्ये सुरू होणाऱ्या शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation – SCO) बैठक होणार आहे. या बैठकीत प्रमुख म्हणजे अफगाणिस्तानात शांतता पुनर्प्राप्तावर चर्चा होणार आहे. यादरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ आमने-सामने असणार आहेत. दरम्यान भारताच्या वतीने या दोन दिवसीय बैठकीत अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या एनएसएशी झालेल्या कोणत्याही द्विपक्षीय बैठकीचे स्पष्टपणे खंडन केले आहे. तर पाकिस्तानच्या एनएसएनेही दोघांमध्ये चर्चेची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. या परिषदेत दरम्यान रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, कझाकस्तान आणि चीनच्या एनएसएची चर्चा करतील.

भारताच्या एनएसएची रशियाच्या एनएसएसोबत बातचित होणे निश्चित आहे. त्यासाठी जवळपास अडीच तासांचे शेड्यूल देखील निश्चित केले गेले आहे. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची दुशान्बेमध्ये हार्ट ऑफ एशिया बैठकीत भेटले होते. पण त्यावेळी देखील दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची औपचारिक द्विपक्षीय बातचित झाली नव्हती. दरम्यान फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये सीजफायर लागू झाली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, एससीओमध्ये आठ देश सदस्य आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझस्तान, कझाकस्तान आणि चीन या देशांचा समावेश आहे. २०१७मध्ये भारत आणि पाकिस्तानला यात पूर्ण सदस्य केले. भारताने नोव्हेंबर २०२०मध्ये या संघटनेच्या बैठकीचे आयोजन केले होते. २०२१पासून या संघटनेच्या अध्यक्षपद ताजिकिस्तान देशाकडे आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -