घरदेश-विदेशभारतात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिलं जाणार अमेरिकेचं औषध!

भारतात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिलं जाणार अमेरिकेचं औषध!

Subscribe

कोरोना रुग्णांवर आपत्कालीन उपचारासाठी या औषधाला परवानगी

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच देशातून कोरोनावर उपचार व्हावे, यासाठी सर्वच वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. कोरोनाविरोधात प्रभावी अशी लस किंवा औषध अद्याप नाही. सध्या इतर आजारांवर जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांची कोरोना रुग्णांवर चाचणी करणं सुरू आहे.

दरम्यान अशाच औषधांपैकी एक असलेल्या रेमडेसिवीर औषधामुळे कोरोना रुग्णांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता भारतात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या औषधाच्या वापराला मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

इबोलाचं ‘हे’ औषध कोरोनावर गुणकारी; उपचारासाठी शोधला नवा मार्ग

अमेरिकेनंतर भारतात देखील या औषधाचा वापर

आतापर्यंत रेमेडिसिव्हिर औषध कोरोनाच्या उपचारात सर्वात प्रभावी मानले जात आहे. रुग्णांवर त्याचा परिणाम दिसून आल्यानंतर औषध बनवणारी अमेरिकेतील कंपनी गिलियड हे औषध अधिक सहजतेने कसे घेता येईल यावर विचार करीत असून कंपनीने एक निवेदन देखील जारी केले आहे. एबोलासाठी तयार करण्यात आलेलं औषध आता कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेनंतर आता भारतात देखील या औषधाचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, “गंभीर कोरोना रुग्णांवर आप्ताकालीन वापरासाठी या औषधाला १ जूनपासून परवानगी देण्यात आली आहे”, असे ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सांगितले आहे.

- Advertisement -

तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रूग्णांना किंवा संशयित रुग्णांनाही हे औषध दिले जाणार आहे. यामध्ये प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांचाही समावेश असणार आहे. सामान्यपणे रुग्णांना दहा दिवस हे औषध दिले जातं असून भारतात फक्त ५ दिवस या औषधाचा डोस मर्यादित ठेवण्यात आला आहे.

भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक

दिलासादायक बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. भारतात आतापर्यंत २ लाखांमधील ९५ हजार ८५२ रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट हा साधारण ५० टक्के आहे. म्हणजेच प्रत्येक १०० रुग्णांमधील ४८ रुग्ण भारतात बरे होताना दिसताय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -