घरताज्या घडामोडीकुलभूषण जाधव यांना विनाशर्त Consular Access द्या, भारताची पाकिस्ताकडे मागणी

कुलभूषण जाधव यांना विनाशर्त Consular Access द्या, भारताची पाकिस्ताकडे मागणी

Subscribe

याबाबतचे निवेदन आज परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृतपणे देण्यात येणार आहे.

पाकिस्तानने इराणमधून अपहरण केलेले आणि सध्या पाकिस्तानी कैदेत असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना विनाशर्त Consular Access द्या, अशी मागणी भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानकडे केली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या रिव्ह्यू पिटीशन दाखल करण्याआधी सुद्धा भारताने ही मागणी लावू धरलेली होती. आयसीजेच्या अनुसार Consular Access आणि स्वतंत्र निपक्ष पद्धतीने ट्रायल व्हायला पाहिजे. आता याबाबतचे निवेदन आज परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृतपणे देण्यात येणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून कुलभूषण जाधव यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. पण प्रत्येक वेळेस पाकिस्तानकडून जिनेव्हा कराराच्या अंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आतासुद्धा भारताने त्याच्या विरोधात आवाज उठवला आहे. म्हणून भारताने विनाशर्त Consular Access कुलभूषण जाधव यांना द्या, अशी मागणी पाकिस्तानकडे केली आहे.

- Advertisement -

गेल्या वेळी पाकिस्तानने जाधव यांच्या आई-वडील आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. हे कृत्य भारताचा अपमान करणारे होते. त्यामुळे आम्हाला वाटते विनाशर्त Consular Access द्यावा, असे कुलभूषण जाधव यांचा बालपणीचा मित्र म्हणाला.

- Advertisement -

तसेच याआधी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला गेला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडिओ पाकिस्तानच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.


हेही वाचा – पायलट-गेहलोत लढाई न्यायालयात; नोटीसविरोधात याचिका दाखल करणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -