घरCORONA UPDATEभारत बायोटेकची WHOसोबत बैठक, त्याआधी विशेषतज्ञांचे पॅनल पाहणार Covaxinचा डेटा

भारत बायोटेकची WHOसोबत बैठक, त्याआधी विशेषतज्ञांचे पॅनल पाहणार Covaxinचा डेटा

Subscribe

विशेषतज्ञांची टिम आता कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल सादर करणार

देशातील लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक (Bharat Biotech) कोरोना विरोधी कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल डेटा DCGI (Drugs Controller General of India) कडे जमा केला आहे. देशात कोरोना लसीकरण अभियानातर्गंत विशेष समितीची आज बैठक होणार आहे. ही समिती भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीचा सादर केलेल्या तिसऱ्या टप्प्यांतील डेटावर अभ्यास करणार आहे. कोव्हॅक्सिन लसीला भारतात पाच महिन्यांपूर्वी कोणत्याही क्लिनिकल ट्रायलशिवाय आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल होती. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीसंदर्भात अनेक वाद आणि चर्चा समोर आल्या होत्या. मात्र आता भारत बायोटेकने संपूर्ण डेटा DCGI कडे सोपवल्यानंतर विशेषतज्ञांची टिम आता कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल सादर करणार आहे. २३ जून रोजी भारत बायोटेक जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) बैठक होणार आहे. त्याआधी DCGIच्या तज्ञांचा अहवालही महत्त्वाचा ठरणार आहे. (India Biotech meets WHO, panel of experts to review Covaxin data)

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी करण्यास उशिर झाल्यामुळे कोव्हॅक्सिनवर अनेक टिका देखील करण्यात आल्यात. कोव्हॅक्सिनच्या फेज १ आणि फेज २ च्या क्लिनिकल ट्रायल्सच्या आधारे जानेवारीत DCGIने भारतात कोव्हॅक्सिनला लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. सुरुवातीच्या काळात केलेल्या अध्यनात कोव्हॅक्सिन लसीपेक्षा कोव्हिशिल्ड (Covishield) लसी सर्वाधिक एन्टीबॉडी तयार करते,असा दावा करण्यात आला होता. त्या अभ्यासानुसार, कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यावर ९८ टक्के एन्टीबॉडीज तयार होतात तर कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतल्यावर ८० टक्के एन्टीबॉडीज तयार होतात,असे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

लसीकरण सुरु झाल्यानंतर कोव्हॅक्सिन लसीचे गंभीर दुष्परिणाम देखील समोर आले होते. कोव्हॅक्सिन लसीच्या चौथ्या टप्प्यातील ट्रायल देखील केली जाणार असल्याचे भारत बायोटेककडून सांगण्यात आले होते. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळवी यासाठी WHO कडे मागणी देखील केली आहे. मात्र अद्याप कोव्हॅक्सिन लसीला WHO च्या यादीत स्थान मिळालेले नाही.


हेही वाचा – Vaccine: अमेरिकेने जगभरात पाठवल्या ५.५ करोड लसीपैंकी भारताला मिळणार २० लाख लसी

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -