घरदेश-विदेशINDIA Bloc Rally: इंडिया आघाडीची महारॅली, राहुल गांधींसह भारतातील दिग्गज नेते एकवटणार

INDIA Bloc Rally: इंडिया आघाडीची महारॅली, राहुल गांधींसह भारतातील दिग्गज नेते एकवटणार

Subscribe

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी (आप) आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक विशाल रॅली काढणार आहे. ‘आप’च्या या मेगा रॅलीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी ‘इंडिया’ आघाडीचे अनेक नेते, पक्ष (सपा) यांच्यासह अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपस्थित राहणार आहेत. (INDIA Bloc Rally India Aghadi Maharally including Rahul Gandhi will unite the legendary leaders of India)

वरिष्ठ आप नेते गोपाल राय म्हणाले की, रामलीला मैदानावर 20,000 हून अधिक लोकांच्या उपस्थितीसह रॅली आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या महारॅलीला संबोधित करणार की नाही याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे राय म्हणाले.

- Advertisement -

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पनाही या रॅलीत होणार सहभागी 

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, द्रमुक नेते तिरुची शिवा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे देखील या रॅलीत सहभागी होणार असल्याचे आप नेते राय यांनी सांगितलं आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही या रॅलीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत सोरेन सध्या तुरुंगात आहेत.

‘संविधानाचे रक्षण करणे हा रॅलीचा उद्देश’

दुसरीकडे, रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) या विरोधी आघाडीच्या ‘लोकशाही वाचवा रॅली’चा उद्देश संविधान वाचवणे हा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. लोकशाही रविवारी होणाऱ्या या रॅलीमुळे लोककल्याण मार्गावर (जेथे पंतप्रधानांचे निवासस्थान आहे) ‘मजबूत संदेश’ जाईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

- Advertisement -

रॅलीसंदर्भात पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते रॅलीला संबोधित करतील. रमेश म्हणाले, ‘कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर लक्ष केंद्रित केलेली ही रॅली नाही. त्यामुळे या रॅलीला ‘लोकशाही वाचवा’ असे संबोधले जात आहे. ही कोणा एका पक्षाची रॅली नसून जवळपास 27-28 पक्ष यात सहभागी झाले आहेत. या रॅलीत ‘ इंडिया’ आघाडीचे सर्व घटक सहभागी होणार आहेत.

सोनिया गांधी या रॅलीला उपस्थित राहतील का, असे विचारले असता रमेश म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नक्कीच उपस्थित राहतील. रमेश म्हणाले की ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) ने 17 मार्च रोजी मुंबईत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते आणि निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर विरोधी आघाडीची ही दुसरी मोठी रॅली असेल. यातून महायुतीमध्ये एकतेचा आणि ऐक्याचा संदेशही जाईल, असे ते म्हणाले.

(हेही वाचा: Loksabha 2024: अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला; हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपा नाराज)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -