घरदेश-विदेशINDIA Mega Rally : तुमचा अरविंद शेर आहे, त्यांनी राजीनामा द्यावा का?...

INDIA Mega Rally : तुमचा अरविंद शेर आहे, त्यांनी राजीनामा द्यावा का? सुनीता केजरीवालांचा जनतेला सवाल

Subscribe

नवी दिल्ली: आज दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधकांची इंडिया आघाडी मोठं शक्तिप्रदर्शन करत आहेत. ‘लोकशाही वाचवा रॅली’चा उद्देश कोणत्याही व्यक्तीला वाचवणे नसून संविधान आणि लोकशाही वाचवणे हा आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. या रॅलीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी उपस्थित आहेत. याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, शिवसेना पक्षप्रमुख (यूबीटी) उद्धव ठाकरे, सपा सुप्रीमो अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन, डावे नेते एस.एस. , राष्ट्रवादीचे (पवार) शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. (INDIA Block Mega Rally You have Arvind Sher should he resign Sunita Kejriwal s question to the public)

रॅलीला अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी संबोधित केले. 20,000 लोकांच्या रॅलीसाठी इंडिया ब्लॉककडून परवानगी घेण्यात आली आहे. रामलीला मैदानाच्या प्रत्येक गेटवर बंदोबस्त ठेवण्याबरोबरच आजूबाजूच्या भागात निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.

- Advertisement -

सुनीता केजरीवाल यांचं भाषण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी रॅलीला संबोधित केले. त्या म्हणाल्या की, “मोदीजींनी माझ्या पतीला तुरुंगात टाकले, त्यांनी योग्य काम केले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनतेला विचारला. तसचं ते तुमच्या केजरीवालांना जास्त काळ तुरुंगात ठेवू शकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुनीता केजरीवाल म्हणाल्या, “तुमचा केजरीवाल शेर आहे. ते करोडो लोकांच्या मनात वास करतात.” कधी कधी असं वाटतं की केजरीवाल हे देशासाठी लढताना शहीद झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. सुनीता केजरीवाल यांनी त्यांचे पती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून जनतेसाठी पाठवलेला संदेशही वाचला.

- Advertisement -

अरविंद केजरीवाला यांची गॅरंटी, सुनीता केजरीवाल यांनी सभेत मुख्यमंत्र्यांचा वाचला संदेश

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी इंडिया रॅलीच्या मंचावरून अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. या संदेशाद्वारे त्यांनी देशाला 6 आश्वासने दिली आहेत.

  • संपूर्ण देशात 24 तास वीज असेल, वीज कपात होणार नाही, संपूर्ण देशातील गरिबांना वीज मोफत दिली जाईल.
  • प्रत्येक गावात आणि परिसरात उत्कृष्ट सरकारी शाळा बांधल्या जातील.
  • प्रत्येक गावात आणि परिसरात मोहल्ला क्लिनिक उघडले जाईल.
  • स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना एमएसपी दिला जाईल.
  • दिल्लीकरांना पूर्ण सरकार दिले जाईल. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल.
  • प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालये बांधली जातील.

( हेही वाचा: Loksabha 2024: रोडकरी गडकरींच्या संपत्तीत अवघ्या 5 वर्षांत 9 कोटींची वाढ; मुंबईत तीन फ्लॅट, सहा आलिशान कार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -