घरदेश-विदेशभारतातून नामशेष झालेला तो चित्ता अखेर पुन्हा येणार, नामबियातून प्रवास सुरू

भारतातून नामशेष झालेला तो चित्ता अखेर पुन्हा येणार, नामबियातून प्रवास सुरू

Subscribe

भारतातून सातत्याने अनेक प्राणी दुर्मीळ होत असल्याचे चित्र आहे. यात भारतातून 55 ते 60 वर्षांपूर्वी चित्त्याची एक प्रजाती नामशेष झाली आहे. जगभरात या चित्त्यांची संख्या केवळ 7 हजारांवर येऊन पोहचली आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक चित्ते हे एकट्या आफ्रिकेजवळील नामबिया देशात आहेत. त्यामुळे नामशेष झालेले तो चित्ता अखेर भारतात पुन्हा येणार आहे. यासाठी भारत आणि नामबियामध्ये 8 चित्त्यांसाठी एक करार झाला आहे. त्यानुसार आठ चित्ते नामबियातून भारतात आणले जातील.

या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये ठेवले जाईल. चित्त्यांना शिकारीसाठी काळविट आणि रानडुक्कर याठिकाणी मोठ्या संख्येने असल्याने त्यांना इथे ठेवले जाईल. भारतात दाखल होणाऱ्या या 8 चित्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या सर्व चित्त्यांना एकाचवेळी भारतात आणण्यासाठी विशिष्ट वाहतूक व्यवस्था केली जात आहे. यावर सीपीएफ भारत, दक्षिण आफ्रिका आणि नामबिया एकत्र येत काम करत आहे. दरम्यान या चित्त्यांना रस्ते मार्गे की हवाई मार्गे कसे आणायचे यासाठी योग्य समन्वय साधला जात असल्याचे नामबियाकडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सिंह किंवा तरस हे प्राणी नाही. मात्र बिबट्यांचा बिबट्यांचा वावर मोठ्याप्रमाणात आहे. यात हे आफ्रिकन चित्ते जंगली मार्गांवर इतर मासंहारी प्राण्यांच्या सहवासात राहणे पसंत करतो. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही, असं वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे.

यामुळे भारतात आता नामबियातून 4 नर 4 मादी, तर दोन लहान आणि इतर दोन पूर्ण वाढ झालेले चित्ते आणले जाणार आहे. या 12 चित्त्यांना दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यासाठीचा करार अंतिम टप्प्यात आहे. या महिन्यात पहिल्या टप्प्यात नामबियातून हे चित्ते भारतात आणले जातील, यामुळे येत्या पाच वर्षात भारतातील नामशेष चित्त्यांची संख्या 30 पर्यंत होईल असे अंदाज व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे चित्ते भारतात आणण्यामागचा उद्देश एक नामशेष प्रजाती भारतात आणण्याचा नाही तर यातून भारत सरकर जैवविविधतेच्या दृष्टीने पर्यावरणावर संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. नामबियासोबतच्या करारामुळे 70 वर्षांनी नामशेष चित्ते भारतात परतणार आहेत. भारत सरकारने 1952 मध्ये हा चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले होते. यामुळे हे चित्ते आता पुन्हा भारताच्या जंगलात मुक्त संचार करताना दिसणार आहे. या चित्त्याचे एक वैशिष्ट म्हणजे जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हणून या चित्त्याकडे पाहिले जाते. हा चित्ता 113 किमी प्रति तास वेगाने धावू शकतो.


मोफतच्या आश्वासनांची खैरात करण्यास सुप्रीम कोर्टाकडून राजकीय पक्षांना मोकळीक?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -