घरताज्या घडामोडीOmicron : ...तर भारतात दररोज १४ लाख कोरोना रूग्ण आढळतील, NITI आयोगाच्या...

Omicron : …तर भारतात दररोज १४ लाख कोरोना रूग्ण आढळतील, NITI आयोगाच्या सदस्याचा अलर्ट

Subscribe

जर युकेसारखी परिस्थिती भारतात निर्माण झाली, तर देशात दरदिवसाला १४ लाख कोरोनाचे रूग्ण हे दिवसापोटी दिसून येतील असा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. सद्यस्थितीला यूके आणि फ्रान्स येथे प्रौढ नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. तरीही याठिकाणी डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. आफ्रिका आणि युरोपातही अनेक ठिकाणी कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिकट आणि वाईट होत असल्याचेही ते म्हणाले. नीति आयोगाचे सदस्य डॉ वी. के. पॉल यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अनेक देशांमध्ये कोरोनाच्या संक्रमणाचा फैलाव हा अतिशय वेगाने होतो आहे, या मुद्द्यावर त्यांनी लक्ष्य वेधले. म्हणूनच आपल्याला ही परिस्थिती ओढावू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच अशी परिस्थिती उद्भवल्यास आपल्याला ही परिस्थिती हाताळण्यास उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

डॉ पॉल यांनी युकेचे उदाहरण देत माहिती सांगितले की, युकेमध्ये दिवसाला ८० हजार कोरोनाचे नवे रूग्ण आढळत आहेत. तर फ्रान्समध्ये ८० लोकांचा डोस पूर्ण झाल्यानंतरही याठिकाणी दररोज ६५ हजार कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. अशीच परिस्थिती जर भारतात उद्भवली तर भारतात दिवसाला १३ लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची प्रकरणे समोर येतील.

युकेमध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग कोरोना रूग्णसंख्या

ब्रिटनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ९३ हजार ४५ कोरोनाचे नवे रूग्ण आढळले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रूग्णसंख्येत ब्रिटनमध्ये वाढ झालेली पहायला मिळाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत १ कोटी ११ लाख ९० हजार कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तर ३२०१ नव्या ओमिक्रॉनच्या रूग्णांची भर ही ब्रिटनमध्ये झाली आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनच्या १४ हजार ९०९ रूग्ण इंग्लंडमध्ये आढळले आहेत, असे युकेच्या आरोग्य सचिवांनी स्पष्ट केले आहे. युकेमध्ये गेल्या २४ तासांमध्ये १११ कोरोनाचे मृत्यू झालेले असून देशातील कोरोनाची मृत्यूची आकडेवारी १ लाख ४७ हजार ४८ हजार इतकी झाली आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -