घरताज्या घडामोडीधक्कादायक, भारतामध्ये लाखो मुले टाईप १ डायबिटीजने ग्रस्त

धक्कादायक, भारतामध्ये लाखो मुले टाईप १ डायबिटीजने ग्रस्त

Subscribe

IDF च्या सर्वेक्षणात सध्या जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात लाखो लहान मुलं टाईप १ डायबिटीजने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.

देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून तज्त्रांनी कोवीडच्या चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यातच कोरोनाचा सर्वाधिक धोका हा डायबिटीजची सहव्याधी असलेल्यांना आहे. याचपार्श्वभूमीवर ICMR ने टाईप १ डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी नवी मार्गदर्शिका जाहीर केली आहे. यादरम्यान, IDF च्या सर्वेक्षणात सध्या जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात लाखो लहान मुलं टाईप १ डायबिटीजने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.

देशात कोरोनाबरोबरोच डायबिटीज रुग्णसंख्येचा आकडाही वाढत आहे. त्यातही भारतात टाईप १ डायबिटीज असलेले रुग्ण सर्वाधिक आहेत. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या अहवालानुसार (IDF) गेल्या वर्षी जगभरात डायबिटीजमुळे तब्बल ६७ लाखाहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यातील मृत व्यक्ती या २० ते ७९ या वयोगटातील असल्याने वैद्यकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीज १ चा आकडा वाढत असल्याचे IDFने म्हटले आहे. २०२१ पर्यंत जगभरात १२.११ लाखाहून अधिक लहान आणि किशोवयीन मुलांना डायबिटीज झाला असून यातील अधिक मुलं ही १५ वर्षांहून कमी आहेत. त्यात भारतातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. भारतात २.२९ लाखाहून अधिक मुलं टाईप १ डायबिटीक असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

डायबिटीजचे दोन प्रकार आहेत. टाईप १ डायबिटीज आणि टाईप २ डायबिटीज..यातील टाईप १ हा कमी वयात होतो. यामुळे संबंधित व्यक्तीला इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागते. कारण यावर आतापर्यंत कुठलाही ठोस उपचार नाही. तर टाईप २ झालेल्या व्यकतींना औषधौपचार आणि थेरेपीमुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. मात्र टाईप २ डायबिडीज झालेल्या व्यक्तींनाही इन्सुलिनची गरज पडू शकते.

भारतातही डायबिटीज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या वर्षी टाईप १ डायबिटीजच्या २४ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली होती. यानुसार भारतात दररोज ६५ हून अधिक लहान मुलं आणि किशोरवयीन मुलं डायबिटीजचे बळी ठरत आहेत.

- Advertisement -

दरम्यान गेल्या वर्षी २०२१ ला जगभरात डायबिटीजमुळे ६७ लाख नागरिक मृत्यूमुखी पडले . यातील १४ लाख मृत्यू चीनमध्ये झाले आहेत. तर ७ लाख मृत्यू अमेरिका आणि ६ लाख मृत्यू भारतात झाले आहेत. पाकिस्तानमध्ये ४ लाख आणि जपानमध्ये २ लाख लोकांचा डायबिटीजमुळे मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -