घरदेश-विदेशगलवान खोऱ्यात चार चीनी सैनिक ठार, वर्षानंतर चीनची कबुली

गलवान खोऱ्यात चार चीनी सैनिक ठार, वर्षानंतर चीनची कबुली

Subscribe

चीनमधील अधिकृत वृत्तवाहिन्या सीजीटीएन, पीएलए डेलीने दिली माहिती

गेल्यावर्षी लडाखमधील भारत -चीन सीमेवरील लडाख गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचेही सैनिक यात मारले गेले होते. मात्र चीनकडून चीनी सैनिक मारले गेल्याचा दावा सातत्याने नाकारण्यात आला. मात्र आता चीन सरकारने या झटपटीत चार सैनिक मारले गेल्याची जाहीर कबुली दिली आहे. या झटापटीत चार सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची नावे देखील जाहीर केली आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’नं (PLA) शुक्रवारी पहिल्यांदाच अधिकृतरित्या दिली.

चीनी सेनेचं अधिकृत वर्तमानपत्र ‘पीएलए डेली’नं शुक्रवारी दिलेल्या एका बातमीनुसार, ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन ऑफ चायना’नं (CMC) काराकोरम रांगेत तैनात असलेल्या आणि जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताविरुद्ध झालेल्या संघर्षात प्राण गमावलेल्या आपल्या पाच सैन्य अधिकारी-जवानांना श्रद्धांजली वाहिली’.

- Advertisement -

तर चीनची सरकारी वृत्तवाहिनी सीजीटीएनच्या वृत्तानुसार, पीएलए आर्मीचे बटालियन कमांडर चेन होंगजुन यांना ‘हिरो’ उपमा देत त्यांचा गौरव केला. तर चेन जियानगाँग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन या तीन जणांचा गलवानमधील झटापटीत मृत्यू झाला. चीनच्या सैन्याचे नेतृत्व करणारे कर्नल क्यू फेबाओ (रेजीमेंटल कमांडर) हे या झटापटीत गंभीर जखमी झाले होते. त्यांना ‘हिरो कर्नल’ या उपाधीने गौरविण्यात आले आहे. पॅन्गाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्याहून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यानच चीननेही कबुली दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी सध्या तणाव कमी करण्याचे प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

गेल्या 6 जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीनी सैन्यामध्ये हिंसक झटापट झाली. यावेळी भारतीय जवानाची संख्या चीनी सैन्याच्या तुलनेत कमी होती. याचाच फायदा घेत भित्र्या चीनने भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवला. चीनी सैनिकांच्या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तर देत हल्ला चढवला. यामध्ये चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचा दावा भारताने केला होता. या हल्ल्यात २० जवान जखमी झाले आहेत. त्यानंतर भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये कर्नल संतोष बाबू, हवालदार पालानी आणि कुंदन झा यांचा समावेश होता. मात्र आता चीनने आता थोड्याप्रमाणात का होईना खरी माहिती जगासमोर आणली आहे.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -