Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश एलएसीवर शांतता राहणार; दोन्ही देशांचे एकमत असल्याचा चीनचा दावा

एलएसीवर शांतता राहणार; दोन्ही देशांचे एकमत असल्याचा चीनचा दावा

Subscribe

नवी दिल्लीः भारत आणि चीनच्या सैन्य दलामध्ये लडाखसह अन्य मुद्द्यांवर रविवारी चर्चा झाली. सीमेवरती शांतता राखण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाले. पूर्व लडाखच्या संवदेनशील मुद्द्यावरही सकारात्मक चर्चा झाली.

सैन्य दलाच्या कंमाडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक झाली. पूर्व लडाख येथील चिनी भागातील चुशुल-मोल्डो सीमा क्षेत्रात ही बैठक झाली. चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीसाठी ते भारतात येणार आहे. या बैठकीचे यजमान पद भारताकडेच आहे. ली शांगफू यांच्या दौऱ्याआधी झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

दोन्ही देशाच्या सैन्यदलामध्ये सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत दोन्ही देशांनी एकमेकांची मते जाणून घेतली. यापुढेही दोन्ही देशांमध्ये संवाद ठेवण्याबाबत सैन्यदलाचे एकमत झाले, अशी माहिती पीपल्स् लिबरेशन आर्मीने सांगितले आहे. तर चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता माओ निंग यांनी सांगितले की, दोन देशांमध्ये शातंता राखण्यासंदर्भात चर्चा झाली. सीमा भागात शांतता राखण्यावर दोन्ही सैन्य दलाने मान्य केले आहे.

रविवारी लष्करी चर्चा दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ कमांडर्समधील चर्चेच्या शेवटच्या फेरीनंतर सुमारे चार महिन्यांनी झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह स्थित 14 व्या कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले. हे आर्मी कॉर्प्स लडाख क्षेत्रातील LAC वर सीमा सुरक्षा व्यवस्था हाताळते. 5 मे 2020 रोजी पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर हा गोंधळ सुरू झाला. यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यामुळे दोन्ही बाजूंनी पॅंगॉन्ग सरोवर आणि गोगरा प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण किनार्‍यातून आपले सैन्य मागे घेतले होते. तथापि, काही समस्या अजूनही शिल्लक आहेत.

- Advertisement -

चार महिन्यांनंतर झालेल्या लष्करी उच्चस्तरीय बैठकीत काही विशेष तोडगा निघाला नाही. या बैठका सुरु असूनही चीनसोबत भारताचा सुरु असलेला सीमा संघर्ष अजूनही संपलेला नाही. तसेच, या बैठकांमध्ये कोणतेही ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. तरीही सीमेवर स्थिरता आणि सुरक्षा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दोन्ही बाजूने सांगण्यात आले.

 

 

- Advertisment -