India-China Talks: भारत आणि चीनमध्ये पार पडली महत्त्वाची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

india china border tension 23rd meeting of wmcc discussion on the situation along the lac held
India-China Talks: भारत आणि चीनमध्ये पार पडली महत्त्वाची बैठक; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

वास्तविक नियंत्रण रेषेवरील (LAC) तणावादरम्यान आज, गुरुवारी भारत आणि चीनमध्ये सीमेच्या मुद्यांवर (WMCC) सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत यंत्रणेची २३वी बैठक पार पडली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार यादरम्यान दोन्ही पक्षांनी भारत आणि चीन सीमेच्या पश्चिम क्षेत्रातील स्थितीवर स्पष्ट आणि गहन चर्चा केली. १० ऑक्टोबरला दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ कमांडरांमध्ये शेवटच्या बैठकीपासूनच्या घडामोडींचा आढावा घेतला.

मंत्रालयाने पुढे म्हटले की, बॉर्डर सुरू असलेले अडथळ्यांसंदर्भात दोन्ही बाजू म्हणजेच भारत आणि चीनने द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करून पूर्व लडाख क्षेत्रातील उर्वरित मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या गरजेवर सहमती दर्शवली. जेणेकरून शांतता पुनर्संचयिक करता येईल. तसेच भारत आणि चीन यावर सहमत झाले की, दोन्ही पक्षांनी जमिनीवर स्थिर स्थिती सुनिश्चिक करणे आणि कोणत्याही अनुचित घटना टाळणे सुरू ठेवावे. तसेच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ कमांडरांची बैठक पुढील दौरा लवकरात लवकर आयोजित केला पाहिजे, यावर सहमती दर्शवली.

गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ चीनच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दोन्ही बाजूंनी हजारो सैनिक सीमेवर तैनात आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये रक्तरंजित चकमक झाली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी लष्करी स्तरावर १३ चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. अखेरीस ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांमध्ये कोर कमांडर स्तरावर चर्चा झाली. मात्र या बैठकीत काही निष्पन्न झाले नाही.

बैठकीनंतर भारताने म्हटले की, बैठकीदरम्यान भारतीय पक्षाने उर्वरित भागातील अडथळे दूर करण्यासाठी रचनात्मक सूचना दिल्या. परंतु चीन याला सहमत नव्हते आणि कोणताही प्रस्ताव देऊ शकलो नाही. त्यामुळे या बैठकीचा काही परिणाम झाला नाही.


हेही वाचा – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी, अमेरिकेने केला मोठा खुलासा…