घरताज्या घडामोडीभारतीय राखी वापरून साजरा करा रक्षाबंधन, यावर्षी चीनी राखीला 'नो एन्ट्री'!

भारतीय राखी वापरून साजरा करा रक्षाबंधन, यावर्षी चीनी राखीला ‘नो एन्ट्री’!

Subscribe

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ने आता रक्षावंधन पुर्णपणे भारतीय राखी वापरूनच साजरं करण्याचं आवाहन केलं आहे. ३ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. ‘भारतीय सामान आमचा अभिमान’ या मोहिमेअंतर्गत १० जूनपासून कैटकडून बहुआयामी राष्ट्रीय मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे चिनी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. कैटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा चिनी राख्यांवर बंदी घातल्यास चीनला ४ हजार कोटींचे नुकसान होणार आहे.

एका आकडेवारीनुसार देशात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ६ हजार कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल राखी उद्योगामध्ये त्यापैकी चिनी राख्यांची बाजारपेठ ही चार हजार कोटींची आहे. रक्षाबंधनच्या पारश्वभूमीवर चीनमधून या राख्या भारतामध्ये येतात. तर दुसरीकडे फोम, कागद, राखी धागा, मोती आणि राखीवरील सजावटीचे बरेचसे सामानही चीनमधून आयात होते.

- Advertisement -

यावर्षी भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही आयात न करण्याचा निर्णयाच कैटने घेतला आहे. यंदाची राखी ही पूर्णपणे भारतीय असावी असा आग्रह कैटचा आहे. त्यामुळेच चिनी मालाचा वापर करुन राख्या बनवू नयेत आणि त्यांच्या व्यवसायही करु नये असं आवाहन कैटने व्यापाऱ्यांना केलं आहे.

कैटने वेगवेगळ्या राज्यातील स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या संस्था, महिला बचत गट, आंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने राख्या तयार करण्यास पुढाकार घ्यावा. या माध्यमातून या महिलांना आर्थिक मदत होईल असं मत दिल्ली विभागाचे कैटचे सुशिल कुमार जैन यांनी व्यक्त सांगितलं.

- Advertisement -

हे ही वाचा – धक्कादायक! स्वत:चे चित्र काढून त्यावर लिहीली मृत्यू दिनांक आणि केली आत्महत्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -