India-China Dispute : चीनच्या कुरापती सुरूच, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर वसवलं गाव

India China Dispute A village built on the border of Arunachal Pradesh
India-China Dispute : चीनच्या कुरापती सुरूच, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर वसवलं गाव

देशाच्या सीमेवर चीनच्या हालचाली सुरुच आहेत. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनच्या सैन्याकडून गाव वसवण्यात आले आहे. या ठिकाणी रस्ते आणि हवाई मार्गाचे निर्माण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर विकासकामे करण्यात आले असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी दिली आहे. चीनकडून वस्त्यांच्या विकासाची कामे हळूहळू सुरुच ठेवण्यात आली आहेत. तसेच भारतीय लष्कराकडून चीनच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी सांगितले की, सीमेवर कोणत्याही संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय बाजूने आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा केली जात आहे. अरुणाचल आणि तिबेटच्या सीमा रेषेवर चीनकडून मोठ्या प्रमाणात गाव, रस्ते आणि हवाई मार्गाचे काम सुरु आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गावर अधिक काम करण्यात येत आहेत. युद्ध झाल्यास ये-जा करण्यास सोपे जावे यासाठी विकासकामे चीनकडून करण्यात येत आहेत.तसेच अरुणाचलच्या दुर्गम भागात चीनकडून 5G नेटवर्कची चाचणी करण्यात येत आहे. सैन्याशी कनेक्ट राहण्यासाठी चीन नेटवर्कवरसुद्धा काम करत आहे.

चीनच्या सैन्याकडून सीमावर्ती भागात गावे वसवली जात आहेत. याचे कारण त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होईल. त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी विकासकामात वेग आणत आहेत. आम्ही त्यांच्या हालचालींवर प्रत्यक्ष नजर ठेवून आहोत. भारताकडूनसुद्धा विकासकामे आणि क्षमतेमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत आहे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कराकडूनसुद्धा तयारी सुरुच आहे. यामुळे भारत भक्कम झाला आहे.

भारतीय लष्कराच्या कमांडरने मान्य केले की सीमेजवळील भागात क्षमता आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कठीण भूभाग आणि प्रतिकूल हवामान हे सर्वात मोठे आव्हान आहे. परंतु भारतीय सैन्य “उच्च पातळीच्या ऑपरेशनल सज्जतेने” पूर्णपणे तयार आहे.


हेही वाचा : ओमायक्रॉनबाधित रुग्णांत अधिक रोगप्रतिकारशक्ती, बायोएनटेक एसई आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचा संशोधन अहवाल