India China Faceoff: अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे चोख प्रतिउत्तर

India China Faceoff arunachal pradesh does not belong india indians clear answar chinas claim
India China Faceoff: अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे चोख प्रतिउत्तर

गेल्या अनेक वर्षांपासून लडाख सीमावादावरून चीन आणि भारतामध्ये वाद सुरु आहे. चीनकडून या सीमेवर ताबा मिळवण्यासाठी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. चिनी मीडियाच्या एका वादग्रस्त लेखातून चीन त्याच्या भूभागाबद्दल भारतासोबत कुठलीही तडजोड करणार नाही. तसेच युद्धाच्या स्थितीतही चीन भारताला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो असं लिहिले आहे. या लेखानंतर आता चीनचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी भारताविरोधात वादग्रस्त विधानं केली आहेत.

भारताविरोधात बोलताना झाओ लिजियान म्हणाले की, बेकादेशीरपणे तयार झालेल्या अरुणाचल प्रदेशला चीन मान्यता देत नाही. त्यामुळे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा अरुणाचल प्रदेश दौऱ्याला आम्ही विरोध करतो. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे चीनने दावा केला आहे. चीनच्या या दाव्याला आता भारताकडून चोख प्रतिउत्तर देण्य़ात आले आहे. भारताने एक निवेदन सादर करत म्हटले की, आम्ही चीनच्या अधिकृत प्रवक्त्याद्वारे दिलेले वक्तव्य ऐकले. मात्र हे वक्तव्ये आम्हाला मान्य नाहीत. असे भारताने स्पष्ट केले.

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग आहे. भारतीय नेते जसं कुठल्याही राज्यात दौरा करु शकतात. तसं नियमितपणे अरुणाचल प्रदेशचा दौरा करतात. त्यामुळे भारतातील कोणत्याही नेत्याला भारतातील एका राज्यात दौरा करण्यास विरोध करणे समजण्यापलीकडे असल्याचे भारताने छाती ठोकपणे सांगितले आहे. चीनकडून यापूर्वीही अरुणाचल प्रदेशातील भारतीय नेत्यांच्या दौऱ्याला विरोधा होताना दिसला. तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांच्याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता. त्यावेळी चीनकडून या दौऱ्याला कडाकडून विरोध करण्यात आला, तसेच भारताविरोधी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती.

सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये लडाख सीमेवरून सैन्य पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा अनिर्णायक असल्याचे म्हटले जातेय. जानेवारी महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशात एक गाव निर्माण केल्याने राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली होती. यावर चीनने आम्ही आमच्या क्षेत्रात बांधकाम केल्याचे म्हटले होते.


Aryan Khan : एनसीबीने आर्यनला ‘सुपरस्टार’ बनवले, राम गोपाल वर्मांची समर्थनार्थ पोस्ट