घरदेश-विदेशIndia-China Standoff : भारत-चीन सीमावादावर लष्कर प्रमुखांच मोठं विधान, भविष्यातील युद्ध सायबर...

India-China Standoff : भारत-चीन सीमावादावर लष्कर प्रमुखांच मोठं विधान, भविष्यातील युद्ध सायबर…

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भारत-चीन सीमा वादावरून मोदी सरकरारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तान आणि चीनला एकाच आघाडीवर ठेवून आपण मोठी चूक करत असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. आता या मुद्द्यावर लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनीही भाष्य केलं आहे. चीन- भारत सीमेवर आता आपण फक्त युद्धाचा ट्रेलर पाहत आहोत. मात्र माहिती प्रणालीच्या काळात युद्ध हे सायबर स्पेस, नेटवर्कच्या माध्यमातून लढले जात आहे. या जोरावर आपल्या भविष्यासाठी युद्धाचे मैदान तयार करावे लागेल. असं मोठं विधान त्यांनी केले आहे. एका ऑनलाईन सेमिनारमध्ये लष्करप्रमुख बोलत होते. या सेमिनारमध्ये भविष्यातील युद्ध सायबर स्पेसच्या माध्यमातून लढावे लागेल असे संकेत दिले आहेत.

पाकिस्तान आणि चीनमधून निर्माण होणाऱ्या आव्हानांवर ते म्हणाले की, भारत सीमेवर भविष्यात होणाऱ्या संघर्षाचा ट्रेलर पाहत आहे. विरोधक देश आपली धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहतील. भविष्यात मोठे युद्ध होण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही. अशा स्थितीत उत्तरेकडील सीमारेषेवर आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांनी सज्ज असलेले सक्षम सैन्य तैनात करण्याची गरज आहे.

- Advertisement -

चीन आणि पाकिस्तानचे नाव न घेता लष्करप्रमुख म्हणाले की, आण्विक सक्षम शेजारी असलेल्या विवादित सीमा आणि त्यांच्यावरील प्रायोजित प्रॉक्सी युद्ध सुरक्षा यंत्रणा आणि संसाधनांची आवश्यकता अधोरेखित करते . माहिती प्रणालीच्या युगात, हे ट्रेलर नेटवर्क, सायबर स्पेसच्या रूपात समोर येत आहेत. या माध्यमातून अस्थिर आणि सक्रिय सीमेवर कट रचले जात आहे.

जनरल नरवणे म्हणाले की, आजूबाजूला पाहिले तर वास्तव जाणवेल. या वास्तवाच्या आधारे उद्याच्या युद्धाची तयारी करायची आहे. या ट्रेलर्सच्या आधारे आपल्याला भविष्यातील रणांगण तयार करायचे आहे.

- Advertisement -

लष्करप्रमुखांनी सर्वोच्च अधिकारी आणि भारतीय लष्कराच्या सर्व कमांडर्ससोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत भारत-चीन सीमेवर नुकत्याच झालेल्या बदलांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत उत्तर आणि पूर्व कमांडनेही सहभाग घेतला. वास्तविक, भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत लष्करप्रमुख या सीमांवर आगामी लष्करी रणनीती तयार करण्यावर भर देत आहेत. भारतीय लष्कर आणि सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज यांच्या दोन दिवसीय ऑनलाईन सेमिनारमध्ये लष्करप्रमुखांनी ही माहिती दिली. या सेमिनारची थीम ‘फ्यूचर वॉर्स अँड काउंटर मेजर्स’ आहे.

यावेळी नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले की, भविष्यात कोणतेही मोठे युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ लष्कर, वायुसेना आणि नौदल यांना युद्धासाठी सज्ज रहावे लागेल असे नाही, तर सरकारच्या सर्व विभागांनाही समन्वयाची गरज असते. आजच्या मल्टीपोलर वर्ल्डमध्ये आपण महासत्तांच्या सैन्यांमध्ये केवळ धक्का-बुक्कीच नाही तर स्पर्धाही पाहत आहोत. पण हे थांबवण्याची गरज आहे. अन्यथा ‘सलामी-स्लाईसिंग’सारख्या घटना घडत राहतील. भविष्यातील युद्धांमध्ये आश्चर्य आणि धक्के असतील पण आपल्याला ‘अँटी- फ्रेजाइल’ राहण्याची गरज आहे.

या ऑनलाईन परिषदेदरम्यान एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात पूर्व लडाखमधील स्टँडऑफने संपूर्ण जगाला दाखवून दिले की, भारताकडे कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याची पुरेशी क्षमता आहे. आजच्या काळात युद्ध केवळ जमीन, आकाश आणि समुद्रावर लढले जात नाही. तर आता यात सायबर, स्पेस आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअरचीही भर पडली आहे. चीनचे अनिर्बंध-युद्ध धोरण शांतता आणि युद्ध दोन्हीसाठी आहे. तंत्रज्ञानाच्या शोधाचा व्यत्यय आणणारा परिणाम होणारच आहे. तुमची आर्थिक गळचेपी होऊ शकते आणि राजनयिक-अलिप्तता होऊ शकते हे युक्रेन आणि सीरियातील घटना दर्शवतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -