घरCORONA UPDATEभारत-चीन तणाव; मोदींची सेनाप्रमुखांसबोत बैठक

भारत-चीन तणाव; मोदींची सेनाप्रमुखांसबोत बैठक

Subscribe

लडाखच्या पुर्व सीमेवर चीनकडून सैन्य वाढविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतही जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज राहणार आहे.

भारत-चीन सीमेवर तणावाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आपल्या कार्यालयात लडाखच्या परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांना सद्यस्थितीवर समाधान शोधण्यास सांगितले आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. या बैठकीत तीनही सेनाप्रमुखांनी मोदींना आपापल्या दलाच्या तयारीची ब्लू प्रिंट सादर केली. पंतप्रधान मोदींनी अजित डोवाल आणि चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्याकडूनही सद्यस्थितीचा आढावा घेतला. रावत यांनी देखील तीनही दलाच्यावतीने आपले काही मुद्दे मांडले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनी सैन्याला युद्धासाठी तयार रहा, असे आदेश नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत देखील तयारीला लागला आहे. आपल्या सैन्य दलाकडे असलेले डिफेंस असेट्स आणि तणाव वाढल्यानंतरची रणनीती काय असेल? याबाबत उच्चस्तरीय बैठकीत खल करण्यात आला. तीनही सैन्यदल प्रमुखांनी मोदींना आपला अहवाल सुपूर्द केला आहे.

- Advertisement -

लडाखच्या पुर्वेकडे असणाऱ्या चीनच्या ताब्यातील परिसरात पाकिस्तान आणि चीन यांचा संयुक्त असा शाहीन नामक युद्ध अभ्यास सुरु आहे. तसेच चीनने दौलत बेड ओल्डी, गलवान नाला आणि पेंग्योंग लेक येथे ५ हजारहून अधिक सैनिक तंबू गाडून तैनात केले आहेत. त्यानंतर भारतानेही तेवढ्याच सैनिकांचे तंबू सीमेवर उभे केले आहेत. याआधी पेंग्योंग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापटी झाली होती. तेव्हापासूनच लडाखच्या पुर्व सीमेवर तणाव पाहायला मिळत आहे.

खरंतर चीन लडाखच्या पुर्वेकडे भारताने हाती घेतलेल्या कामांमुळे विचलिच झाला आहे. तिथे रस्ते आणि सैन्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा तयार केल्यामुळे चीनला घाम फुटला आहे. या भागातील सर्व विकास कामे भारताने तात्काळ थांबवावीत असे चीनचे म्हणणे आहे. मात्र भारत काम थांबवायला तयार नाही. चीनला समजेल अशाच भाषेत उत्तर देण्यासाठी भारत यावेळी तयार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -