भारतही रंगला फिफाच्या रंगात

जागतिक क्रमवारीत ९७व्या रँकला असणाऱ्या भारतातही फिफाचं वेड दिसून येत आहे. जगातील सर्व फुटबॉलप्रेंमीसाठी एखाद्या उत्सवासारखा असणारा फिफाच्या २१व्या विश्वचषकाबद्दल रशियातच नाहीतर जगभरात दिसून येत आहे.

fifa sweets
फिफा वर्ल्डकप २०१८ साठी खास केक

फिफा वर्ल्डकप २०१८ रशियात सुरू झाला आहे. जगातील सर्व फुटबॉलप्रेंमीसाठी एखाद्या उत्सवासारखा असणारा फिफाच्या २१व्या विश्वचषकाबद्दल रशियातच नाहीतर जगभरात दिसून येत आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या ३२ देशांसोबतच जगभरातील इतर देशही फिफाच्या रंगात रंगले आहेत. जागतिक क्रमवारीत ९७व्या रँकला असणाऱ्या भारतातही फिफाचं वेड दिसून येत आहे.

घरही रंगले फिफाच्या रंगात 

केरळमधील कोचीतल्या एका फुटबॉल-प्रेमी जोडप्याने चक्क आपल्या घरालाच हाउस ऑफ ब्राझिल करुन टाकले आहे. रशियातील चालू असलेल्या फिफावर्ल्डकपमधील आपल्या आवडत्या ब्राझिल देशाला आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी ब्राझीलच्या ध्वजाच्या रंगात स्वताचे घर रंगविले असून “हाऊस ऑफ ब्राझिल” असे नाव घराला दिले आहे. घराच्या बाहेरील भिंतीमध्ये टीमच्या खेळाडूंची चित्रे आहेत. तर गेटवर एक भव्य फुटबॉलही आहे.

fifa home
केरळमधील “हाऊस ऑफ ब्राझिल” (सौजन्य-ANI)

फिफा फिव्हर केकमध्येही

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी शहरातील एका बेकरीच्या मालकाने फिफा वर्ल्डकप २०१८ च्या थीमवर आधारित असलेले केक तयार केले आहेत. यात फिफाचा चषक आणि फिफा फुटबॉल सारखे केक तयार केले आहेत. “आम्हाला आशा आहे की भविष्यात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारत सहभागी होईल”असं बेकरीच्या मालकाने यावेळी सांगितले.

cake fifa
फिफा वर्ल्डकप २०१८ च्या थीमवर आधारित असलेले केक (सौजन्य-ANI)

फिफाची जादू पतंगावरही

कोलकाता शहर नेहमीच आपल्या फुटबॉलच्या वेडासाठी फेमस आहे. अशाच एका कोलकत्यातील पतंग तयार करणाऱ्या व्यक्तीने रशियातील फिफा विश्वचषक स्पर्धेत सहभागी देशांच्या ध्वजांवर आधारित पंतग तयार केल्या आहेत. अजित दत्ता असे त्याचे नाव आहे.

kites fifaaa
अजित दत्ताने तयार केलेल्या पंतगा  (सौजन्य-ANI)

मिनीएचररुपात फिफाची ट्रॉफी

तामिळनाडुतील कोइंबतूरमधील मिनीएचर आर्टिस्ट (लघुरूपचित्रकार) मारियप्पान पी यांनी केवळ ९०० मिलिग्रॅम सोन्यापासून “फिफा वर्ल्डकप २०१८” च्या ट्रॉफीचे लघुरूप बनवले आहे. यावेळी मारियप्पान यांनी सांगितले की, “माझा हेतू जगभरातील फुटबॉल प्रेमींना प्रोत्साहन देणे आहे आणि मला आशा आहे की आपला देश २०२२ मध्ये नक्की फिफा कपसाठी पात्र होईल.

trophy fifa
“फिफा वर्ल्डकप २०१८” च्या ट्रॉफीचे लघुरूप  (सौजन्य-ANI)

 

गोडधोडातही फिफा

कोलकात्यातील मिठाई दुकानात ‘फिफा वर्ल्डकप २०१८ च्या ट्रॉफी आणि सहभागी देशांच्या ध्वजावर आधारित कस्टम-मेड केक्स आणि मिठाईची विक्री होत आहे. खेळाडूंच्या प्रतिकृतीचे केकही आहेत. मिठाई आणि केक्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.

sweetss fifa
‘फिफा वर्ल्डकप २०१८ वर आधारित कस्टम-मेड केक्स  (सौजन्य-ANI)