India Corona Update: दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट

India reports less than 1 lakh daily new COVID19 cases after 63 days
India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वात मोठी घट! १ लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद

देशातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. रविवारी देशात १ लाख १४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले होते. तर २ हजार ६७७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आज देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. देशात २४ तासांत १ लाख ६३६ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ४२७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख ७४ हजार ३९९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८९ लाख ९ हजार ९७५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ४९ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ७१ लाख ५९ हजार १९० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या देशात १४ लाख १हजार ६०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत देशभरात २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.

६ जूनपर्यंत देशभरात ३६ कोटी ६३ लाख ३४ हजार १११ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १५ लाख ८७ हजार ५८९ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार पाहायला गेले तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रापेक्षा केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये दिवसाला सर्वाधिक रुग्णांची वाढ होत आहे. रविवारी महाराष्ट्रात १२ हजार ५५७ नवे कोरोनाबाधित आढळले. तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे १४ हजार ६७२, २० हजार ४२१ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. एकीकडे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनाचे नवे रुप आढळत आहे.


हेही वाचा – भारतात आढळला कोरोनाचा धोकादायक New Variant ; ७ दिवसात वजन होते कमी