India Corona Update: देशात रुग्णसंख्येत घट, तर मृत्यूमध्ये वाढ; २४ तासांत २,३५,५३२ नव्या रुग्णांची भर; ८७१ जणांचा मृत्यू

देशातील पॉझिटिव्हिटी रेट घसरून १३.३९ टक्क्यांवर आला आहे. सध्या देशात २० लाख ४ हजार ३३३ सक्रीय रुग्ण आहेत.

nagpur corona test

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोनाची मृत्यूची संख्या अधिक वेगाने वाढत आहे. काल, शुक्रवारी देशात २ लाख ५१ हजार २०९ नव्या रुग्णांची वाढ आणि ६२७ जणांचा मृत्यू झाला होता. तर आज कालच्या आकडेवारीच्या तुलनेत १५ हजार ६७७ नव्या रुग्णांची घट होऊन २४४ मृत्यूच्या संख्येत वाढ झाली. म्हणजेच देशात गेल्या २४ तासांत २ लाख ३५ हजार ५३२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८७१ जणांच्या मृत्यूच्या संख्येत नोंद झाली आहे. तसेच ३ लाख ३५ हजार ९३९ जण बरे होऊ घरी गेले आहे.

देशातील पॉझिटिव्हिटी रेट घसरून १३.३९ टक्क्यांवर आला आहे. सध्या देशात २० लाख ४ हजार ३३३ सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान काही राज्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत आहे. कर्नाटकमध्ये डेल्टाची जागा ओमिक्रॉनने घेतल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी ८ लाख ५८ हजार २४१
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ९३ हजार १९८
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ८३ लाख ६० हजार ७१०
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २० लाख ०४ हजार ३३३
देशातील एकूण चाचण्यांची संख्या – ७२ कोटी ५५ लाख ०७ हजार ९८९
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ६५ कोटी ०४ लाख ८७ हजार २६०


हेही वाचा – NeoCov: चीनच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या निओकोव्ह कोरोना व्हायरसबाबत WHO काय म्हणाले?