India Corona Update: देशात ११८ दिवसांत सर्वात कमी नव्या रुग्णांची नोंद

India Corona Update 31,443 new COVID19 cases in the last 24 hours
India Corona Update: देशात ११८ दिवसांत सर्वात कमी नव्या रुग्णसंख्येची नोंद

देशात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. आज देशात ११८ दिवसांत सर्वात कमी नव्या रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. २४ तासांत देशात ३१ हजार ४४३ नवे कोरोनाबाधित आढळले आहे. तसेच आता देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या आता ४ लाख ३१ हजार ३१५ झाली असून गेल्या १०९ दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे.

दरम्यान देशात असे काही राज्य आहेत, जिथल्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढवली आहे. गेल्या दिवसांत केंद्राकडून यांना एक पत्र लिहिले होते आणि त्या राज्यासाठी पथकाची स्थापन केली गेली आहे. या राज्यातील कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या निर्बंधांची माहिती घेणे आणि त्यांना गरजेनुसार सल्ला देणे, हे या पथकाचे मुख्य काम आहे. उत्तर पूर्वेतील अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरातील वाढत्या केसेसच्या अनुषंगाने केंद्राने एक पथक तिथे पाठवले आहे.

देशातील आठ राज्यांमध्ये कोरोना केसेस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज व्हर्च्युअल बैठक घेणार आहेत. वाढत्या केसेस रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याचा विचार करणे हा बैठकी मागचा हेतू आहे. यामध्ये आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, सिक्किम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.


हेही वाचा – कोरोना लसीच्या डोसचे Mixing And Matching धोकादायक ठरू शकते – WHO