घरCORONA UPDATEIndia Corona Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; ४७ कोटींहून...

India Corona Update: देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; ४७ कोटींहून अधिक जणांचे झाले लसीकरण

Subscribe

देशात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. तर मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४१ हजार ८३१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५४१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३९ हजार २५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १६ लाख ५५ हजार ८२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २४ हजार ३५१ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ८ लाख २० हजार ५२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख १० हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत ६० लाख १५ हजार ८४२ कोरोना लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत ४७ कोटी २ लाख ९८ हजार ५९६ जणांचे लसीकरण पार पडले आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशात २४ तासांत १७ लाख ८९ हजार ४७२ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४६ कोटी ८२ लाख १६ हजार ५१० जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान मागच्या चार दिवसात कोरोनावर उपचार करणार्‍यांची संख्या वाढली आहे. दहा राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर राज्यातील कोरोना स्थिती जाणून घेतली. तसेच कोरोनाबाबत उपाययोजना करणाच्या सूचना केल्या. ४६ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -