घरताज्या घडामोडीCoronavirus Cases Today: देशात 24 तासांत 5,476 नव्या रुग्णांची वाढ; 59,442 कोरोनाचे...

Coronavirus Cases Today: देशात 24 तासांत 5,476 नव्या रुग्णांची वाढ; 59,442 कोरोनाचे सक्रिय रुग्ण

Subscribe

काल, शनिवारी देशात 5 हजार 921 नव्या रुग्णांची वाढ झाली होती आणि 88 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. आज कालच्या आकडेवारीच्या तुलनेत रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे.

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येतील घट आजही कायम आहे. देशात दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आधिकाधिक घट होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 476 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 158 जण मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर 9 हजार 754 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात 59 हजार 442 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

काल, शनिवारी देशात 5 हजार 921 नव्या रुग्णांची वाढ झाली होती आणि 88 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. आज कालच्या आकडेवारीच्या तुलनेत रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. आज 445 रुग्णांची घट होऊन 5 हजार 476 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृत्यूच्या संख्येत 131ने घट होऊन 158 मृत्यूची नोंद झाली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – 4 कोटी 29 लाख 62 हजार 953
देशातील एकूण मृत्यूची संख्या – 5 लाख 15 हजार 036
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – 4 कोटी 23 लाख 88 हजार 475
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – 59 हजार 442
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – 77 कोटी 28 लाख 24 हजार 246
देशातील एकूण लसीकरण – 1 कोटी 78 कोटी 83 लाख 79 हजार 249

- Advertisement -

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाला आहे. नेहमीप्रमाणे नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. काल दिवसभरात 963 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 535 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात आज 10 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.


हेही वाचा – Weather Update: ‘या’ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -