Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE India Corona Update: देशात २४ तासात ५६० रुग्णांचा मृत्यू, ३८ हजारांहून अधिक...

India Corona Update: देशात २४ तासात ५६० रुग्णांचा मृत्यू, ३८ हजारांहून अधिक बाधितांची नोंद

देशात सध्या ४ लाख २४ हजार २५ अँक्टिव्ह रुग्ण

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश मिळाले आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी त्यात सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. देशातील बाधितांचा विचार केला असता गेल्या २४ तासात देशात ३८ हजार ७८ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (India Corona Update: more than 38,000 infected in 24 hours)  कालच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पहायला मिळत आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. बाधितांच्य संख्येत घट होत असल्याचे देशाला दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

देशात नवे बाधित रुग्ण कमी होत असले तरी देशातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात सध्या ४ लाख २४ हजार २५ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे नवे बाधित रुग्ण कमी होत असले तरी अँक्टिव्ह रुग्ण त्याहून दुप्पट आहेत. कालच्या तुलनेच आजची अँक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. अँक्टिव्ह रुग्ण ४ लाखांहून अधिक असले तरी देशाचा रिकव्हरी रेट हा आता ९७.३१ टक्क्यांवर आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट देखील वाढला असल्याने आता देशातील अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होण्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

देशातील मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. मात्र तरीही मृत्यूदरात देखील चढ उतार पहायाला मिळत आहे. देशात गेल्या २४ तासात ५६० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. काल हाच आकडा ८हून अधिक होता. देशात आतापर्यंत ४ लाखांहून अधिक मृत्यू झालेत. ICMR ने दिलेल्य माहितीनुसार,देशात आतापर्यंत ४४ कोटी २० लाख २१ हजार ९५४ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात त्यातील १९ लाख ९८ हजार ७१५ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात.


- Advertisement -

हेही वाचा – पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या सर्व प्रमुख व्हेरियंटवर भारताची ‘ही’ लस प्रभावी

 

 

 

 

- Advertisement -