India Corona Update: चिंताजनक! देशातील कोरोना मृत्यूचा उच्चांक; २४ तासांत ६,१४८ जण दगावले

Coronavirus India Update india reports 46617 new covid19 cases 59384 recoveries and 853 deaths in the last 24 hours
Coronavirus India Update: देशातील कोरोना बधितांच्या आकड्यात आज पुन्हा घट, तर कोरोनाबळींचा आकडा ८५३ वर

देशात एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्या बाजूला आज अचानक देशातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येने उच्चांकी गाठली आहे. मागील काही दिवसांपासून २ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू दिवसाला होत होता. पण आज ६ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू २४ तासांत झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९४ हजार ५२ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६ हजार १४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख ५१ हजार ३६७ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ६७६ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ७६ लाख ५५ हजार ४९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २३ कोटी ९० लाख ५८ हजार ३६० जणांचे लसीकरण पार पडले आहे.

९ जूनपर्यंत देशात ३७ कोटी २१ लाख ९८ हजार २५३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या. यापैकी काल दिवसभरात २० लाख ४ हजार ६९० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या, अशी माहिती माहिती आयसीएमआरने दिली आहे.

 

जगभरातील नव्या कोरोनाबाधित संख्येत वाढ होण्याचा वेग मंदावताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत १७ कोटी ५१ लाख ५६ हजारांहून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ७६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ८६ लाख ६१ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाली आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कोरोना लसीचे जगातील पहिले ट्रायल कानपूरमध्ये