घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशात आज कोरोनाचे 67,084 नवे रुग्ण, मृत्युदरात मोठी...

India Corona Update : देशात आज कोरोनाचे 67,084 नवे रुग्ण, मृत्युदरात मोठी वाढ

Subscribe

देशातील कोरोनाच्या आकडेवारीत दररोज चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आज गुरुवारी 10 फेब्रुवारीला कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 67 हजार 084 नवीन रुग्ण आढळले आहेत.

देशातील कोरोनाच्या आकडेवारीत दररोज चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आज गुरुवारी 10 फेब्रुवारीला कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 67 हजार 084 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर या काळात 1 लाख 67 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत. 1 हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत कोरोनाच्या मृत्युदरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. कारण काल कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1हजार 217 इतकी होती.

- Advertisement -

 

कोरोनामुळे आजपर्यंत झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 06 हजार 520 इतकी आहे.देशातील दैनिक पॉझिटिव्हीटी रेट आता 4.44 टक्के झाला आहे.देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 78 हजार 060 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात अॅटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 7 लाख 90 हजार 789 इतकी झाली आहे. आतापर्यंत देशात 1,71,28,19,947 इतक्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

 

कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी ट्विट करून लिहिले, 15-18 वयोगटातील एक कोटीहून अधिक किशोरवयीन मुलांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी देशात कोरोनाचे 167,059 रुग्ण होते आणि 959 लोकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू केरळ आणि महाराष्ट्रात होत आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडा 5 लाखांच्या पुढे गेला आहे. त्यापैकी 1.43 लाखांहून अधिक मृत्यू फक्त महाराष्ट्रात झाले आहेत.

 


हे ही वाचा – Ban on Import of Drones : देशात ड्रोन आयातीवर केंद्राची बंदी, या कारणासाठी मिळणार सूट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -