घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; 6,915 नवे रुग्ण,...

India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; 6,915 नवे रुग्ण, तर 180 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

देशातील कोरोना रुग्णसंख्येत आज मोठी घट झाली आहे. त्यामुळे लाखांच्या घरात असलेली रुग्णसंख्या आज जवळपास 7000 वर येऊन घसरली आहे. गेल्या 24 तासात देशात 6,915 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 180 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आज 16,864 रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. काल म्हणजे सोमवारी 8,013 रुग्ण आढळून आले होते तर 119 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आज रुग्णसंख्येत जवळपास 1000 रुग्णांची घट पाहायला मिळाली.

- Advertisement -

देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 92472 इतकी आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.22 टक्के झाले आहे. याशिवाय आत्तापर्यंत 42,32,4550 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना ध्या देशात रिकव्हरी रेट 98.59 टक्के झाला आहे. तर आत्तापर्यंत 51,4023 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आज एकूण 5 लाख 14 हजार 23 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे.

देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा आता 0.77 टक्क्यांवर आला आहे. तर विकली पॉझिटिव्हीटी रेट देखील आता 1.11 टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत (28 फेब्रुवारीपर्यंत) देशात एकूण 76.83 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे. गेल्या 24 तासात 9,01,647 कोरोना चाचण्या करण्यात आली आहे.

- Advertisement -

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशभरात एकूण 177.70 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरातील एकूण 18,22,513 लसीचे डोस देण्यात आले आहेत.


ऑपरेशन गंगाअंतर्गत युक्रेनमधून मुंबईत पोहोचले सातवे विमान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मायदेशी परतणाऱ्यांशी संवाद


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -