घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या आज 10 हजारांच्या खाली; 8013...

India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या आज 10 हजारांच्या खाली; 8013 नवे रुग्ण, तर 119 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

भारतातील कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज गेल्या दोन महिन्यांनंतर पहिल्यांदाच देशात 10 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 8,013 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 119 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासाजनक बाब म्हणजे देशात 24 तासात 16,765 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. तर सक्रिया रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस घसरतेय. सध्या देशात 8871 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील डेली पॉझिटिव्ही रेट हा 1.11 टक्के आहे.

भारतात कोरोनाचे आत्तापर्यंत 4 कोटी 29 लाख 24 हजार 130 रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 5 लाख 13 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 4 कोटी 23 लाख रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परते आहेत. देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 1 लाख 2 हजार 601 इतकी झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98.56 टक्के झाले आहे. तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.24 टक्के झाले आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत जगात 51 व्या स्थानी आहे. तर संक्रमित रुग्णांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 27 फेब्रुवारी 2022 पर्यंत कोरोनाविरोधी लसीचे 177 कोटी 50 लाख 86 हजार डोस देण्यात आले आहेत. तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, देशात आतापर्यंत सुमारे 77 कोटी कोरोना चाचण्या झाल्या असून कालच्यापर्यंत सुमारे 7 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा आहेत.

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्णसंख्येची स्थिती

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : 4 कोटी 29 लाख 24 हजार 130

देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या : 1 लाख 2 हजार 601

देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या : 4 कोटी 23 लाख 7 हजार 686

देशातील एकूण मृत्यूची संख्या : 5 लाख 13 हजार 843

देशातील एकूण लसीकरण : 177 कोटी 50 लाख 86 हजार 335


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -